Karnataka Election : कर्नाटकात काँग्रेस सरकार बनवणार; सी व्होटर सर्व्हेची आकडेवारी काय सांगते?

Cvoter Karnataka Opinion Poll : भाजपला अँन्टी इन्कबन्सी फटका बसण्याची शक्यता आहे,
C voter Karnataka Opinion Poll
C voter Karnataka Opinion PollSarkarnama

Cvoter Karnataka Opinion Poll : कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. काँग्रेस, भाजप, जेडीएससह साऱ्याच पक्षांनी जोरदार प्रचाराचा मोर्चा पुकारला आहे. सर्वांनीच आपली सत्ता येईल, अशा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान कर्नाटक निवडणुकांसंदर्भात एबीपी-सी व्होटर संस्थेचा ओपिनिअन पोल घेतला आहे.

कर्नाटक निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. कर्नाटक निवडणूक देशाची दिशा ठरवणारी निवडणूक असेल असेही बोलले जात आहे. कर्नाटकात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) कर्नाटकात ठाण मांडून आहेत. प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. या सर्वात कर्नाटकाची जनता कोणाला कौल देणार? याबाबत उत्सुकता आहे.

C voter Karnataka Opinion Poll
PM Modi's Advertising Expenditure: पंतप्रधानांचा स्वत:च्या जाहिरातांवर कोट्यावधींचा खर्च? ठाकरे गटाच्या नेत्याने थेट आकडेवारीच जाहीर केली, पाहा व्हिडीओ...

एबीपी आणि सी वोटरचा ओपिनियन पोल आकडेवारी समोर आली आहे. या सर्व्हेच्या दावा केल्यानुसार कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस पक्ष स्वबळावर बहुमताचा आकडा गाठण्याची शक्यता वर्तवण्यात आले आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंना मोठा धक्का बसणार असे सर्व्हेत दावा केला आहे. कर्नाटकात विधानसभेत एकूण 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान पार पडणार आहे. तर निकाल १३ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल लागणार जाहीर होणार आहे.

कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 24 मे रोजी संपत आहे. निवडणूक जसजशी नजीक येत आहे, तसतसे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप, काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल हे तीनही पक्ष जरी रिंगणात असले तरी, मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपात होत आहे. यामध्ये खरी सध्या तरी काँग्रेस पुढे दिसत आहे. काँग्रेस सरकार बनवणार असे सर्व्हेच्या आकडेवारी वरून तरी प्रथमदर्शनी दिसत आहे. राज्य सरकारच्या कामकाजावर कर्नाटकची जनता नाराज असून, भाजपला अँन्टी इन्कबन्सी फटका बसण्याची शक्यता आहे, असे सर्व्हेच्या आकडेवारीवरून दिसून येते.

C voter Karnataka Opinion Poll
Karnataka Election : BJP उमेदवाराची JDS च्या उमेदवाराला धमकी ; Audio Clip व्हायरल ; अर्ज मागे घ्या, अन्यथा..

कर्नाटकाचे चित्र काय? कौल कुणाला?

एबीपी-सी वोटर सर्व्हेच्या दावा -

विधानसभेच्या एकूण जागा 224 -

काँग्रेस - 107 ते 119 जागा

भाजप - 76 ते 86 जागा

जेडीएस - 23 ते 35

इतर - 0-5 जागा

मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पसंती?

बसवराज बोम्मई - 31%

सिद्धरामैया -41%

कुमारस्वामी - 22%

डी के शिवकुमार - 3%

इतर - 3%

पाच वर्षात राज्य सरकारची कामगिरी कशी?

चांगली - 29%

सरासरी - 19%

वाईट - 52%

मुख्यमंत्र्यांची कामगिरी कशी राहिली ?

चांगले - 25%

सरासरी - 24%

वाईट - 51%

पंतप्रधान मोदी यांचे काम कसे आहे ?

चांगले - 49%

सरासरी - 18%

वाईट - 33%

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com