Karnataka Election : कर्नाटकामध्ये 68 टक्के मतदान, घटलेलं मतदान कुणाच्या पथ्यावर?

Karnataka Aseembly Election 2023 Exit Poll : मागील वेळी 72 टक्के मतदान झाले होते.
Karnataka Election : Karnataka Aseembly Election 2023 Exit Poll :
Karnataka Election : Karnataka Aseembly Election 2023 Exit Poll : Sarkarnama

Karnataka Aseembly Election 2023 Exit Poll : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आज मतदान पार पडले. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते एक्झिट पोलमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात लढतीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि जेडी(एस) यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळाली. दरम्यान आज कर्नाटक विधानसभेसाठी 68 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. 2018 मध्ये राज्यात 72 टक्के मतदान झाले होते. (68 percent voting in Karnataka)

कर्नाटकमध्ये आज अनेक नेत्यांनी मतदान केले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन, कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार मीना आणि त्यांच्या पत्नी, केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या शोभा करंदलाजे यांच्यापासून ते इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती, अभिनेते ध्रुव सर्जा, दर्शन, विजय आणि उपेंद्र राव यांचा समावेश होता.

Karnataka Election : Karnataka Aseembly Election 2023 Exit Poll :
Nitish Kumar News: विरोधकांची मोट बांधण्यासाठी नितीश कुमारांचं एक पाऊल पुढे; ठाकरे, पवारांची उद्या घेणार भेट

आज बुधवार 10 मे रोजी बेंगळुरूमध्ये मतदान करणाऱ्यांमध्ये एकूण 5,31,33,054 मतदार राज्यभरातील 58,545 मतदान केंद्रांवर मतदान करण्यास पात्र होते, कर्नाटकातील 224 सदस्य असलेल्या कर्नाटकसाठी 2,615 उमेदवार रिंगणात आहेत. हवामान विभागावने येत्या काही दिवसांत पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतरही बंगळुरूमधील मतदारांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला.

कर्नाटक निवडणुकांचा निकाल 13 मे रोजी येणार आहे. मतदानाला संथ प्रारंभ झाला. मात्र यानंतर मतदानाने गती वाढली. निवडणूक आयोगाच्या सांगितल्यानुसार, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 65 टक्के झाले. सर्वात जास्त मतदान चिकबल्लापूर या जिल्ह्यात 76.64 टक्के, तर बंगळुरू महानगरपालिका क्षेत्रात (दक्षिण) सर्वात कमी म्हणजे 48.63 टक्के मतदान झाले.

Karnataka Election : Karnataka Aseembly Election 2023 Exit Poll :
Karnataka Exit Poll : कर्नाटकात काँग्रेस 140 पार; महत्त्वाच्या एक्झिट पोलने वाढवले भाजपचे टेन्शन...

घटेलली मतदानाची टक्केवारी ही सत्ताधाऱ्यांच्या फायदेशीर ठरते. सत्ताधाऱ्यांविरोधातील अन्टीइन्कबन्सी फँक्टर काही अंशी मवाळ होते. मात्र मागच्या विधानसभेच्या तुलनेने घटलेली मतदानाची आकडेवारी कुणाच्या पथ्यावर पडणार हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com