Karnataka Election 2023 : पाचशेंच्या नोटा उधळणारे डीके शिवकुमार यांच्या संपत्तीत ६८ टक्के वाढ ; एकुण संपत्ती १४१४ कोटी..

Karnataka Election 2023 : त्यांच्या नावावर एक टोयोटा मोटार आहे.
 d k shivakumar
d k shivakumar Sarkarnama

DK Shivakumar Congress Leader who makes assets worth 100 crores Annually : कर्नाटकमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डीके शिवकुमार यांच्या संपत्तीत २०१८ पासून दरवर्षी ६८ टक्के वाढ होत आहे. दरवर्षी त्यांच्या संपत्तीत १०० शंभर कोटी रुपये वाढ होत असल्याचे आढळले आहे. सध्या त्यांची एकुण संपत्ती १४१४ कोटी रुपये इतकी आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डीके शिवकुमार निवडणूक आयोगाकडे दिलेल्ला उमेदवारी अर्जावरुन ही माहिती मिळाली आहे. २०१३ मध्ये डीके शिवकुमार यांच्याकडे २५१ कोटी रुपये संपत्ती होती.

२०१८ मध्ये त्यांच्याकडे ८४० कोटी रुपये संपत्ती होती. या संपत्तीत वाढ होऊन २०२३ मध्ये पाच वर्षांत ६८ टक्के वाढ झाली, निवडणूक आयोगाकडे त्यांची दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देणार आली आहे.

 d k shivakumar
#दात दाखवा केजरीवाल..; केजरीवालांच्या CBI चौकशीनंतर नेटकरी चिंतेत ; 'तो' फोटो व्हायरल..

देशातील सर्वात श्रीमंत नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचे १२ बँकांमध्ये खाती आहेत. त्यातील काही खाती त्यांचा भाऊ डीके सुरेश यांच्यासोबतची संयुक्त खाती आहेत. डीके शिवकुमार यांच्यावर २२५ कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्या नावावर एक टोयोटा मोटार आहे. तिची किमंत आठ लाख ३० हजार इतकी आहे. आपले वार्षिक उपन्न १४.२४ कोटी रुपये असल्याचे त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. आपल्या पत्नीचे वार्षिक उपन्न १.९ कोटी रुपये आहे.

डीके शिवकुमार हे सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहे. आता त्यांची नजर मुख्यमंत्रीपदावर आहे. ते सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहे. निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यपदीपदाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. काही दिवपापूर्वी डीके शिवकुमार यांनी एका रॅलीत पाचशेंच्या नोटा उधळल्या होत्या. याबाबत निवडणुक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.

 d k shivakumar
Mallikarjun Kharge Letter to PM Modi : खर्गेंनी मोदींना लिहिलं पत्र ; 'या' बाबत लवकरच निर्णय..

काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील श्रीरंगपणपट्टणमध्ये ‘प्रजा ध्वनी यात्रा’ आयोजित केली होती. तेव्हा मांड्या जिल्ह्यातील बेनिवहल्ली येथे रोड शोदरम्यान डीके शिवकुमार यांनी काही लोकांवर नोटा उधळल्या होत्या. डीके शिवकुमार ५००-५०० रुपयांच्या नोटा उडवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मांड्या ग्रामीण पोलिसांनी डीके शिवकुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.रोड-शो वेळी ढोल-ताशे वाजवणाऱ्या कलाकारांना डीके शिवकुमार हे बक्षीस म्हणून पैसे देत होते, असं काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com