Dk Shivkumar News : सिद्धरामय्या विधानसभेत निघून गेले; डी. के. शिवकुमारांच्या कृतीने वेधले सगळ्यांचे लक्ष

DK Shivakumar viral video : डी. के. शिवकुमार यांच्या या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे
Siddaramaiah, Rahul Gandhi, Dk Shivkumar News
Siddaramaiah, Rahul Gandhi, Dk Shivkumar NewsSarkarnama

Karnataka Cabinet Oath Ceremony : काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी कर्नाटच्या मुख्यमंत्री पदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. तर कर्नाटक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे विधानसभेत गेले.

येथे पोहचल्यानंतर डी. के. शिवकुमार यांच्या कृतीने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले. गाड्यामधून उतरल्यानंतर सिद्धरामय्या पुढे चालत होते. त्यांच्यामागे डी. के. शिवकुमार होते. सिद्धरामय्या (Siddaramaiah) हे विधानसभेच्या पाऱ्या चढून विधानसभेत गेले. त्यांच्यानंतर डी. के. शिवकुमार हे विधानसभेच्या पाऱ्यांवर नतमस्तक झाले. शिवकुमार यांच्या या कृतीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. शिवकुमार यांच्या या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Siddaramaiah, Rahul Gandhi, Dk Shivkumar News
Karnataka Cabinet News : काँग्रेसने मंत्रिमंडळात असे साधले जातीय समीकरण; दक्षिण कर्नाटकला झुकते माप

दरम्यान, बेंगळुरू येथील श्री कांतीराव स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा झाला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge), राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियांका गांधी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते या सोहळ्याला उपस्थित होते.

आज (ता.२०) आठ मंत्र्यांनीही शपथ घेतली असून कर्नाटकचे नवे मंत्रिमंडळ आता सज्ज झाले. जी परमेश्वरा, के एच मुनियप्पा, के जे जॉर्ज, एम बी पाटील, सतीश जारकीहोळी, प्रियांक खर्गे, रामलिंगा रेड्डी व बी झेड जमीर अहमद खान यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी या मंत्र्यांना शपथ दिली आहे.

Siddaramaiah, Rahul Gandhi, Dk Shivkumar News
Karnataka CM oath Ceremony : सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, डीके शिवकुमार यांच्यासह 'या' आठ आमदारांनी घेतली शपथ

मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत काँग्रेसने (Congress) दिलेले आश्वासन पाळण्यात येणार असल्याची ग्वाही राहुल गांधी यांनी दिली. त्यामुळे आता मंत्रिमंडळ बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्या मंत्रिमंडळात उत्तर कर्नाटकाऐवजी दक्षिण कर्नाटककडे काँग्रेसने लक्ष दिले आहे. दक्षिण कर्नाटकातून 5 मंत्री आहेत, तर उत्तरेतून 3 मंत्री आहेत. 8 पैकी 3 मंत्री अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत. बाकी समाजातील आमदारांना देखील मंत्री करून पक्षाने सामाजिक संदेश दिला आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com