काँग्रेसचे संकटमोचक शिवकुमार राजस्थानमध्ये; गेहलोत-पायलट वादात मध्यस्थी?

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद सुरूच आहे. यातच काँग्रेसचे संकटमोचक मानले जाणारे डी.के.शिवकुमार हे राजस्थानमध्ये दाखल झाले आहेत.
karnataka congress president d k shivakumar will meet ashok gehlot
karnataka congress president d k shivakumar will meet ashok gehlot

नवी दिल्ली : राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद सुरूच आहे. या वादावर तोडगा निघत नसताना आता काँग्रेसचे (Congress) संकटमोचक मानले जाणारे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार (D.K.Shivakumar) हे राजस्थानमध्ये दाखल झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. हा वाद मिटवण्याची जबाबदारी पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर दिल्याचे बोलले जात आहे. 

शिवकुमार हे आज जयपूरमध्ये दाखल झाले आहेत. ते मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भेट घेणार आहेत. ही भेट खासगी असल्याचा दावा शिवकुमार यांनी केला आहे. त्याचा राज्यातील तसेच, राष्ट्रीय राजकारणाशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. परंतु, गेहलोत आणि पायलट यांच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी त्यांना पाठवण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी हरियाणाच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षा कुमारी शैलजा या जयपूरमध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्या दिल्लीला परतल्या होत्या. आता दोनच दिवसांत शिवकुमार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. ते मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दिल्लीला रवाना होणार आहेत. दिल्लीत ते पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत. यामुळे गेहलोत-पायलट वादात तोडगा काढण्याची जबाबदारी शिवकुमार यांच्यावर सोपवण्यात आल्याची चर्चा आहे. 

राज्यातील काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. पायलट यांना पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वात महत्वाचे पद देण्याचा प्रस्ताव आहे. पायलट यांनी यासाठी नकार कळवला आहे. त्यांनी राज्यातच राहण्याची भूमिका पक्षाला कळवली आहे. पुढील विधानसभा निवडणूक 2023 मध्ये होणार असून, यासाठी आतापासूनच तयारी करण्याचे कारण पायलट यांनी दिले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मागील काही दिवसांपासून गेहलोत आणि पाललट गटामध्ये संघर्ष वाढला होता. काही दिवसांपूर्वी सचिन पायलट हे दिल्लीतही गेले होते. त्यांनी केलेल्या मागण्यांवर वर्षभरानंतरही पक्षाने निर्णय न घेतल्याने ते नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रभारी अज माकन हे नुकतेच राज्यात  दाखल झाले होते. त्यांची गेहलोत यांच्यासह पायलट गटाचीही बैठक घेतली होती. पायलट समर्थकांना पक्ष संघटनेत आणि सरकारमध्ये स्थान देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली होती. यातच सिद्धू यांचे बंड पंजाबमध्ये यशस्वी पायलट यांनी पक्ष नेतृत्वावर दबाव टाकण्यास सुरवात केली आहे. 

पायलट यांनी मंत्रिमंडळात समर्थक आमदारांना जास्त प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी लावून धरली आहे. परंतु, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला विरोध केला आहे. राजस्थानध्ये मंत्रिमंडळात 30 पर्यंत मंत्री असू शकतात. सध्या मुख्यमंत्री गेहलोत यांच्यासह 21 मंत्री आहेत. सरकारमध्ये सध्या 9 मंत्रिपदे रिक्त आहेत. पायलट यांनी ही सर्व मंत्रिपदे समर्थकांसाठी मागितली आहेत. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला नकार दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com