Congress party Latest Marathi News, Political News Updates in Marathi
Congress party Latest Marathi News, Political News Updates in MarathiSarkarnama

काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर! सरचिटणीसांनी पक्षालाच पाडलं तोंडावर

उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये मोठी गटबाजी

बंगळूर : आगामी विधान परिषद निवडणुकांमुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. काँग्रेसमध्ये (Congress) अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर नाराजी समोर आली आहे. पक्षाच्या महिला सरचिटणीसांनी थेट पक्षाच्या नेतृत्वालाच जाब विचारला आहे. यामुळे नेतृत्व तोंडघशी पडल्याचं चित्र आहे. पक्षात महिलांवर अन्याय केला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

कर्नाटक काँग्रेसच्या सरचिटणीस कविता रेड्डी यांना विधान परिषदेचे तिकीट नाकारण्यात आले. यानंतर त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित पक्षाला धारेवर धरले. महिला सक्षमीकरणाचा गाजावाजा करणारा पक्षच महिलांना विसरला, असा घरचा आहेर त्यांनी दिला आहे. राजकीय प्रतिनिधित्व देताना स्त्री-पुरुष समानता झाली तरच समाजिक न्यायाला अर्थ आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या फेसबुक पोस्टमध्ये काँग्रेसला आता नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे.

कविता रेड्डी यांनी म्हटले आहे की, आमदार आणि खासदारकीची तिकिटे मिळवणारे सर्व पुरुष जिंकतात का? मग महिलांनाच तिकीट देताना जिंकण्याच्या निकष कशासाठी? सगळ्या गोष्टी असलेले पुरुषही निवडणुका हरले आहेत. तर मग महिलांबद्दल हा प्रश्न का उपस्थित केला जातो. काँग्रेसकडून 50 टक्के लोकसंख्यकडे का दुर्लक्ष केले जात आहे? विधानसभा, विधान परिषद अथवा संसदेत महिलांना प्रतिनिधित्वच द्यायचे नाही का? तिथे महिलांना नो एंट्री आहे का?

Congress party Latest Marathi News, Political News Updates in Marathi
रशिया-युक्रेन युद्धामुळं जगावर कोसळणार मोठं संकट; महागाईचा आगडोंब उसळणार!

कर्नाटकात विधान परिषदेच्या सात जागांसाठी 3 जूनला निवडणूक होत आहे. या निवडणुकीत 224 आमदार हे मतदार असतील. विधानसभेत काँग्रेसचे 69 आमदार आहेत. यामुळे पक्षाचे दोन उमेदवार निवडून येणे निश्चित आहेत. भाजपचे 121 आमदार असून, त्यांचे 4 उमेदवार तर धर्मनिरपेक्ष जनता दलाचे 32 आमदार असून, त्यांचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. उमेदवार यादीवरून प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D.K.Shivkumar) आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaih) हे आमनेसामने आले होते. यामुळं दोघांनाही दिल्लीत बोलावून पक्ष नेतृत्वानं उमेदवार यादी निश्चित केली आहे. अखेर काँग्रेसनं सुवर्णमध्य साधत दोन्ही नेत्यांच्या गोटातील प्रत्येकी एकाला उमेदवारी दिली आहे.

Congress party Latest Marathi News, Political News Updates in Marathi
आत्ताच मंत्रिपदाचा राजीनामा देतो! संतप्त उदय सामंतांचं खुलं आव्हान

राज्यातील पक्ष नेतृत्वाने हाय कमांडकडे शिफारस केलेल्या यादीवरून शिवकुमार आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यातील मतभेद समोर आले होते. काँग्रेसनं एन. नागराजू यादव आणि अब्दुल जब्बार या दोघांना उमेदवारी जाहीर केली आहे. यादव हे सिद्धरामय्या यांच्या जवळचे मानले जातात. सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री असताना यादव हे बंगळूर महानगर परिवहन महामंडळाचे 2016 ते 18 या कालावधीत अध्यक्ष होते. ते आता काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. जब्बार हे ज्येष्ठ काँग्रेस नेते आहेत. ते सिद्धरामय्या यांचे निकटवर्ती आहेत. सिद्धरामय्या यांनीच जब्बार यांची पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com