प्रदेशाध्यक्ष दारू पिऊन बोलतात, 10 टक्के लाच घेतात! काँगेस नेत्यांचा व्हिडीओ व्हायरल

माजी खासदार अन् माध्यम समन्वयाकामधील हा संवाद आहे.
Congress
Congress File Photo

बेंगलुरू : कर्नाटक काँग्रेसचे (Karnataka Congress) प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना त्यांच्याच सहकारी नेत्यांनी अडचणीत आणले आहे. माजी खासदार व माध्यम समन्वयकामधील संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यामध्ये हे दोघे शिवकुमार यांच्यावर 10 ते 12 टक्के लाच घेत असल्याचा आरोप करत आहेत. तसेच ते मद्यप्राशन करून कार्यालयात येत असल्याचा दावाही ते करताना दिसत आहेत.

माजी खासदार व्ही. एस. उगरप्पा आणि प्रदेश काँग्रेसचे माध्यम समन्वयक सलीम अहमद यांच्यामधील संवादाचा हा व्हिडीओ आहे. शिवकुमार व त्यांचे सहकारी लाच घेत असल्याचा थेट आरोप यामध्ये कऱण्यात आला आहे. सलीम अहमद म्हणतात की, आधी 6 ते 8 टक्के लाच घेतली जात होती. आता ही 10 ते 12 टक्क्यांवर गेली आहे. डीके अशीच तडजोड करतात. मुलगुंड (डीके यांचे सहकारी) यांनी यातून 50 ते 100 कोटी रुपये कमावले आहेत.

Congress
केंद्रीय मंत्र्यांनी थेट अमेरिकेत जाऊन केला लखीमपूर खीरी घटनेचा निषेध

मुलगुंड यांनी एवढे कमावले असतील तर डीके यांना किती मिळाले असतील, असा विचार करा, असा आरोप अहमद करताना दिसत आहेत. शिवकुमार यांचा पक्षाला काही उपयोग नसल्याचे विधानही दोघांनी केले आहे. डीके यांना प्रदेशाध्यक्ष करण्यासाठी आम्ही खूप परिश्रम घेतले. पण त्यांनी आम्हाला आणि पक्षाला दुखावलं आहे, असे उगरप्पा बोलताना दिसतात.

Congress
महात्मा गांधींच्या सांगण्यावरूनच सावरकरांनी मागितली माफी!

शिवकुमार हे अडखळत बोलत असतात. मला माहित नाही की त्यांचा बीपी कमी असतो की ते दारू पिऊन येतात. माध्यमांच्या प्रतिनिधींनी याबाबत विचारले आहे. सिध्दरामय्या यांची देहबोली कडक आहे, असंही अहमद म्हणाले आहेत. डी. के. शिवकुमार हे पहिल्यांदाच वादात अडकले नाहीत.

काही महिन्यांपूर्वी त्यांनी एका कार्यकर्त्याला थोबाडीत मारले होते. याबाबतचा व्हिडीओही समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हा कार्यकर्ता शिवकुमार यांच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करत होता. तसेच शिवकुमार यांच्याविषयी पक्षातील अन्य काही नेत्यांच्याही तक्रारी आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com