उद्धव ठाकरेंवर भडकले येडियुररप्पा अन् म्हणाले, एक इंचही जमीन देणार नाही!

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील प्रदेशाचा वाद पुन्हा उफाळून आला असून, दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री आमनेसामने आले आहेत.
karnataka cm yediyurappa targets maharashtra cm uddhav thackeray
karnataka cm yediyurappa targets maharashtra cm uddhav thackeray

बंगळूर :  कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या तीळपापड झाला आहे. त्यांनी एकही इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, अशी आठमुठी भूमिका घेतली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक – महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले होते की, महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना आजच्या हुतात्मा दिनी विनम्र अभिवादन. सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग, समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबियांना मानाचा मुजरा..! 

कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत. या अभिवचनासह हूतात्म्यांना विनम्र अभिवादन, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. 

यावर आता कर्नाटकातील भाजप सरकारने आगपाखड करण्यास सुरवात केली आहे. कर्नाटकचे मुख्यंत्री बी.एस.येडियुरप्पांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे विधान अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांचा निषेध करतो. आमच्या बाजूची एक इंचही जमीन आम्ही देणार नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com