मी किती काळ मुख्यमंत्री राहणार, यापेक्षा काय केले हे महत्त्वाचे

राज्यात पुन्हा अधिकारावर आणण्याचा माझा प्रयत्न राहील, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगितले. ते दिल्लीत कार्यक्रमात बोलत होते.

मी किती काळ मुख्यमंत्री राहणार, यापेक्षा काय केले हे महत्त्वाचे
Basavaraj Bommaisarkarnama

नवी दिल्ली : ''मी किती काळ मुख्यमंत्री राहणार, हे महत्त्वाचे नाही. या अवधीत मी काय केले हे महत्त्वाचे आहे. मला मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन या काळात उत्तम प्रशासन देण्याचा व पक्ष राज्यात पुन्हा अधिकारावर आणण्याचा माझा प्रयत्न राहील, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगितले. ते दिल्लीत कार्यक्रमात बोलत होते.

बसवराज बोम्मई (Karnataka Chief Minister) म्हणाले की, भाजप फक्त एका समाजापुरता मर्यादित नाही. हा पक्ष आहे जो समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचतो आणि त्यांचे समर्थन मिळवतो. उत्तर कर्नाटकातून लिंगायत समाजातील अनेक भाजप आमदार आणि खासदार आहेत. परंतु एखाद्या पक्षाला सत्तेवर येण्यासाठी त्याला अनुसूचित जाती, जमाती, आदिवासी, मागासवर्गीयांच्या पाठिंब्याची आवश्यकता असते. या वर्गाने भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजप आता कर्नाटकातील समाजातील सर्व घटकांचा पक्ष आहे.

Basavaraj Bommai
वक्क बोर्डाची जमीन लाटणाऱ्या अप्पर जिल्हाधिकाऱ्याला अटक

''येत्या २०२३ च्या विधानसभा निवडणुका माझ्या नेतृत्वाखाली व पक्षाच्या राष्ट्रीय आणि राज्यातील नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत, माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकात भाजपची चांगली बांधणी केली. मुख्यमंत्रिपदावरून खाली येऊन त्यांनी इतरांना संधी दिली आहे, असे त्यांनी सांगितले.

बोम्मई यांनी काल केंद्रीय मंत्र्याची भेट घेतली. राज्यातील विविध योजनांबाबत त्यांनी यावेळी चर्चा केली. दिल्लीतील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बोम्मई दोन दिवसापासून दिल्लीत आहेत. त्यांनी मंत्री प्रल्हाद जोशी, पर्यावरण श्रममंत्री भूपेंद्र यादव, ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली.

Related Stories

No stories found.