कर्नाटकात पुन्हा तिढा..मुख्यमंत्री बोम्मई तीन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून - karnataka chief minister basavraj bommai is in delhi to meet party high command-sj84 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

भाजपचे किरीट सोमय्या अखेर महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना
चरणजीत चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री राज्याचे प्रभारी हरीश रावत यांची घोषणा
गणेशोत्सव विसर्जनामुळे पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद
अंबिका सोनी यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद नाकारले
पुरग्रस्तांसाठी सरकारची महत्वाची घोषणा ; नव्या निकषानुसार मदत

कर्नाटकात पुन्हा तिढा..मुख्यमंत्री बोम्मई तीन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 ऑगस्ट 2021

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे मागील तीन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून आहेत. 

नवी दिल्ली : कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) हे मागील तीन दिवसांपासून दिल्लीत (Delhi) ठाण मांडून आहेत. कर्नाटकातील मंत्रिमंडळ स्थापनेचा (Cabinet Formation) तिढा निर्माण झाला आहे. मंत्रिमंडळाची यादी घेऊन तीन दिवसांपासून बोम्मई दिल्लीत आहे. पक्षश्रेष्ठींची भेटी घेऊनही यादीला हिरवा कंदील मिळत नसल्याने ते दिल्लीतच अडकले आहेत. 

बोम्मई हे 1 जुलै रोजी दिल्लीत दाखल झाले आहेत. ते मंत्रिमंडळाची यादी घेऊन आले आहेत. त्यांनी आजा कर्नाटकचे प्रभारी अरुणसिंह यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी संसद भवनात जाऊन उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचीही भेट घेतली. बोम्मई यांनी काल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा केली होती. बोम्मई यांनी म्हटले आहे की, मी मंत्रिमंडळाच्या 2 ते 3 याद्या पक्षाच्या अध्यक्षांकडे सादर केल्या आहेत. पक्षाचे अध्यक्ष अंतिम यादी तयार करतील. यानंत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटिल यांच्याशी चर्चा करुन मंत्रिमंडळ शपथविधीची तारीख निश्चित होईल. 

येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात बोम्मई हे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री होते. त्यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा कार्यभार होता. तसेच बोम्मई हे येडियुरप्पा यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळं बोम्मई यांची निवड झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. बोम्मई यांच्या निवडीत येडियुरप्पा यांचाच हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारातही येडियुरप्पा यांचाच वरचष्मा राहील, असे बोलले जात होते. 

येडियुरप्पा यांनी बोम्मई यांना चांगले काम करण्याचा सल्लाही दिला. बोम्मई यांनी शपथ घेतल्यानंतर गरीबांना मदत करण्यावर भर असेल, असे सांगितले आहे. दरम्यान, बोम्मई हे त्यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते. तसेच त्यांच्याकडं कायदा, संसदीय कार्य ही खातीही होती. 61 वर्षांचे बोम्मई हे माजी मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई यांचे पुत्र आहेत. कर्नाटकातील लिंगायत समाजाचे वर्चस्व विचारात घेऊन भाजपने याच समाजातील बोम्मई यांना पुढे आणले आहे. 

हेही वाचा : भाजप नेत्याचा यू-टर्न..आधी संन्यास नंतर खासदारकी सोडण्यास नकार 

बोम्मई यांनी 2008 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची पक्षातील वाटचाल सुरू झाली. ते व्यवसायाने अभियंते असून दोन वेळा विधानपरिषदेचे आमदार तर तिन वेळा शिगांव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहे. कर्नाटक विधीमंडळात पक्षाचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख