मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला = 8+7+7+7+4
karnataka cabinet will have representatives from all casts

मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला = 8+7+7+7+4

कर्नाटकात नवीन मंत्रिमंडळ स्थापनेसाठी भाजप हाय कमांडने पाच सूत्री नियमावली तयार केली आहे.

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) नवीन मंत्रिमंडळ स्थापनेसाठी भाजप (BJP) हाय कमांडने पाच सूत्री नियमावली तयार केली आहे. समुदायानुसार मंत्रिमंळात प्रतिनिधित्व देण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. यामुळे नवीन मुख्यमंत्री (Chief Minister) बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांची पहिल्याच आठवड्यात अग्निपरीक्षा होणार आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या निर्मितीसाठी 8+7 +7 +7 +4 = 33 सूत्रानुसार विचार केला जात आहे. लिंगायतांना 8 जागा, वक्कलिगांना 7, दलितांसाठी 7, मागासवर्गीयांसाठी 7 जागा आणि जैन आणि देवांगसह इतर समाजाला 4 जागा देण्याचा प्रस्ताव आहे. या पाचकलमी सूत्रानुसार मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा सुरू आहे.  हाय कमांडकडून सर्व समाजांना प्रतिनिधित्व दिले जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात हाय कमांडने राज्य नेत्यांना निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री बोम्मई या सूत्रानुसार यादी तयार करून हाय कमांडकडे पाठणार आहेत. 

येडियुरप्पा आणि इतर नेत्यांशी चर्चा करून बोम्मई दिल्लीला जाणार आहेत. हाय कमांडकडून या यादीवर शिक्कामोर्तब झाल्यावर नवीन मंत्रिमंडळ तयार केले जाईल. मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी इच्छुकांनी लॉबिंग सुरू केले आहे. जुन्या मंत्र्यांना वगळून तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचे नियोजन आहे. राज्यात भाजपला सत्तेवर आणण्यास कारणीभूत ठरलेल्या काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) काही आयाराम मंत्र्यांना वगळले जाण्याची शक्यता आहे. 

कर्नाटकात बी.एस.येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची जागा कोण घेणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनीही पुन्हा एकदा सर्वांनाच धक्का देत मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये फारसे चर्चेत नसलेल्या बसवराज बोम्मई यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. बोम्मई हे कर्नाटकचे विसावे मुख्यमंत्री ठरले आहेत. 

बोम्मई हे  येडियुरप्पांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते. तसेच त्यांच्याकडं कायदा, संसदीय कार्य ही खातीही होती. 61 वर्षांचे बोम्मई हे माजी मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई यांचे पुत्र आहेत. कर्नाटकातील लिंगायत समाजाचे वर्चस्व विचारात घेऊन भाजपने याच समाजातील बोम्मई यांना पुढे आणले आहे. बोम्मई यांनी 2008 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची पक्षातील वाटचाल सुरू झाली. ते व्यवसायाने अभियंते असून दोन वेळा विधानपरिषदेचे आमदार तर तिन वेळा शिगांव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहे. कर्नाटक विधीमंडळात पक्षाचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in