Karnataka Cabinet Expansion : कर्नाटकात खातेवाटप? मुख्यमंत्र्यांकडे अर्थ, परमेश्वरांकडे गृह, शिवकुमारांना काय मिळालं?

Karnataka Government Cabinet Expansion : मंत्रिमंडळात जातीय, प्रादेशिक संतुलन राखण्यात आले आहे.
Karnataka Government Cabinet Expansion
Karnataka Government Cabinet ExpansionSarkarnama

Karnataka Government Cabinet Expansion : कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. मात्र खातेवाटप कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. एएनआय या वृत्तसंस्थेने कर्नाटक मंत्रिमंडळाची एक यादी प्रकशित केली आहे. मात्र या यादीवर अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

एएनआयने प्रकाशित केलेल्या या यादीवर काँग्रेसकडूमन अजूनही शिक्कामोर्तब झालेले नाही. मात्र या यादीनुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे अर्थ मंत्रालय असेल तर उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्याकडे मुख्य व मध्यम पाटबंधारे आणि बेंगळुरू शहर विकास विभाग आहेत. तर गृहखाते परमेश्वरांना देण्यात आले आहे. मात्र ही अधिकृत यादी नसून, लवकरच राजभवनातून याबाबच यादी प्रसिद्ध होणार असल्याची माहिती मिळत आहे.

व्हायरल झालेल्या यादीत काँग्रेसचे नेते एच के पाटील यांच्याकडे विधी व संसदीय कामकाज मंत्रालय असेल. याशिवाय पक्षाचे नेते दिनेश गुंडू राव यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण, तर कृष्णा बायरे गौडा यांच्याकडे महसूल खातं दिलं गेलं आहे.

Karnataka Government Cabinet Expansion
Parliament building News : मल्लिकार्जुन खर्गे अन् अरविंद केजरीवालांना राष्ट्रपतींबद्दल केलेले वक्तव्य भोवणार; काय आहे प्रकरण?

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र चित्तापूरचे आमदार प्रियांक खर्गे यांना ग्रामविकास आणि पंचायत राज खाते मिळाले आहे. केजे जॉर्ज यांच्याकडे ऊर्जा खाते असेल. त्याचबरोबर के एच मुनियप्पा यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार यांची जबाबदारी देण्यात आली आहे. रामलिंगा रेड्डी यांच्याकडे परिवहन खात्याची जबाबदारी आहे. त्याचबरोबर एन चालुवरायस्वामी यांना कृषी मंत्रालय देण्यात आले आहे.

कर्नाटक मंत्रिमंडळात 24 मंत्र्यांचा समावेश

शनिवारीच काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना त्यात २४ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. राज्यात काँग्रेसने विजय मिळवल्यानंतर आठवडाभरात मंत्रिमंडळातील सर्व 34 मंत्रीपदे भरण्यात आली आहेत. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी या २४ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 23 आमदारांशिवाय या मंत्र्यांमध्ये एनएस बोसाराजू यांचा समावेश आहे, ज्यांना काँग्रेस हायकमांडने आश्चर्यचकितपणे मंत्रीपद बहाल केले आहे. बोसराजू सध्या कर्नाटकच्या विधान परिषद किंवा विधानसभेचे सदस्य नाहीत.

Karnataka Government Cabinet Expansion
Karnataka Politics : कर्नाटकात आज 'हे' २४ आमदार होणार मंत्री..

सिद्धरामय्या मंत्रिमंडळात या नेत्यांचे स्थान :

पाटील, कृष्णा बायरेगौडा, एन चेलुवरायस्वामी, के व्यंकटेश, एचसी महादेवप्पा, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष ईश्वर खांद्रे आणि माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी शपथ घेतली. त्यांच्याशिवाय के.एन.राजण्णा, शरणबसप्पा दर्शनपुरे, शिवानंद पाटील, रामाप्पा बाळाप्पा तिम्मापूर, एस.एस.मल्लिकार्जुन, शिवराज संगाप्पा तंगडगी, शरणप्रकाश रुद्रप्पा पाटील, मंकल वैद्य, लक्ष्मी हेब्बाळकर, रहीम खान, डी सुधाकर, संतोष लाड, मधु बी.एस.बी.एस. बंगारप्पा, एमसी सुधाकर आणि बी नागेंद्र यांचा शपथविधी झालेल्या आमदारांमध्ये समावेश आहे. यापूर्वी, सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये मंत्री असलेले आणि चार वेळा आमदार राहिलेल्या एम कृष्णप्पा यांचा मात्र यावेळी मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही.

शपथविधी समारंभात घोषणाबाजी का झाली?

कृष्णप्पा यांच्यासह मंत्रिमंडळात समावेश नसलेल्या आमदारांच्या समर्थकांनी शपथविधी सोहळ्यात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांच्या हातात आपल्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी करणारे फलक होते.

Karnataka Government Cabinet Expansion
Congress's Questions to BJP : नऊ वर्षांच्या भाजप सरकारला काँग्रेसचे नऊ प्रश्न; पंतप्रधान मोदींवर निशाणा

काँग्रेसच्या सूत्रांच्या माहितीनुसार लक्ष्मी हेब्बाळकर, मधु बंगारप्पा, डी सुधाकर, चेलुवरायस्वामी, मानकल वैद्य आणि एमसी सुधाकर हे शिवकुमार यांच्या जवळचे मानले जातात. एका अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वरिष्ठ आणि कनिष्ठ आमदारांना योग्य सन्मान देताना जातीय आणि प्रादेशिक समीकरणे लक्षात घेऊन मंत्रिमंडळ सत्तेचे संतुलन राखले आहे.

सिद्धरामय्या आणि शिवकुमार हे मागील तीन दिवसांपासून राष्ट्रीय राजधानीत होते आणि त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पक्ष नेतृत्वाशी चर्चा केली. के सी वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांच्यासह प्रमुख केंद्रीय नेत्यांसोबत सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात तासभर चाललेल्या चर्चेनंतर २४ मंत्र्यांची नावे निश्चित करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com