BJP : भाजप युवा नेत्याची कुऱ्हाडीने वार करून हत्या ; कर्नाटक हादरलं

"दक्षिण कन्नड जिल्ह्यात आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याची हत्या निंदनीय आहे," असे टि्वट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
Praveen Nettaru
Praveen Nettarusarkarnama

नवी दिल्ली : भाजपच्या (bjp) युवा नेत्याच्या हत्येनं कर्नाटक (karnataka) हादरलं आहे. हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. भाजप कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांच्या अटकेच्या मागणीसाठी निदर्शने सुरू केली आहेत. काल (मंगळवारी) मध्यरात्री बेल्लारे परिसरात ही घटना घडली. (Praveen Nettaru latest news)

कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्री भाजपचे युवा नेते प्रवीण नेट्टारू (Praveen Nettaru) यांची निर्घृण हत्या करण्यात आली. नेट्टारू हे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कर्नाटकात हिंदू संघटनांनी बंद पुकारला आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांचे पाच पथक विविध ठिकाणी रवाना झाले आहेत.

प्रवीण यांचे पोल्ट्रीचे दुकान आहे. ते दुकान बंद करून घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांचा रस्ता अडवला. प्रवीण यांच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करण्यात आला. त्यावेळी प्रवीण यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करुन पुन्हा त्यांच्यावर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. उपचारांसाठी त्यांना नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

Praveen Nettaru
बाळासाहेबांचे नाव कुणी वापरले तर माझे काय होईल, अशी भीती उद्धव ठाकरेंना आहे का ?

दुकान बंद झाले तेव्हा फारसे लोक नव्हते, त्यामुळे कोणीही मदतीला नव्हते. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी प्रवीण यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे. रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर प्रचंड गोंधळ उडाला होता.

"दक्षिण कन्नड जिल्ह्यात आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याची हत्या निंदनीय आहे," असे टि्वट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल. आरोपींना कायद्यानुसार शिक्षाही होईल, असे बोम्मई यांनी माध्यमांना सांगितले.

Praveen Nettaru
Shiv sena : शरद पवारांनी शिवसेना फोडली का ? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर..

या घटनेनंतर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. मध्यरात्री रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांनी प्रवीण यांना न्याय देण्याची मागणी केली. कार्यकर्त्यांनी 'आम्हाला न्याय हवा'च्या घोषणा दिल्या. यावेळी त्यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली.

महिनाभरातील दुसरी हत्या

भाजप नेते मोहम्मद अन्वर यांची 23 जून रोजी कर्नाटकमध्ये चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची हत्या केली. मोहम्मद अन्वर हे भाजपचे सरचिटणीस होते. भाजप खासदार शोभा करंदलाजे यांनी या हत्येमागे कट्टरवाद्यांचा हात असल्याचे सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in