भाजपचा बडा नेता अडचणीत; न्यायालयाच्या दणक्यानंतर पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांकडून आरोपपत्र
B. Sriramulu
B. SriramuluSarkarnama

बंगळूर : कर्नाटकात भाजपची (BJP) सत्ता असून, परिवहन मंत्री बी. श्रीरामुलू (B. Sreeramulu) यांच्यामुळं सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण बळ्ळारी येथील २७.२५ एकर जमीन बळकावल्याप्रकरणी श्रीरामुलू यांना आरोपी बनविण्यात आले आहे. न्यायालयाच्या दणक्यानंतर पोलिसांनी हे पाऊल उचललं आहे. यामुळं सरकारला मोठ्या नामुष्कीला सामोरं जावं लागत असून, श्रीरामुलू यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

समाज परिवर्तन समुदाय आणि सिटीझन्स फॉर डेमॉक्रसीचे अध्यक्ष एस. आर. हिरेमठ यांनी यांच्या श्रीरामुलू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बळ्ळारी येथे जमीन बळकावल्याची कागदपत्रे हिरेमठ यांनी माध्यमांसमोर सादर केली. कर्नाटक (Karnataka) सरकारमधील परिवहन मंत्र्यावर असा आरोप झाल्यानं राजकारण तापलं आहे. विरोधकांनी या मुद्द्यावर सरकारला लक्ष्य केलं असून, भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला आहे.

B. Sriramulu
जाधवांचा पाय खोलात! प्राप्तिकर विभागाच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड

या प्रकरणाबाबत पत्रकार परिषदेत हिरेमठ म्हणाले की, राष्ट्रीय नैसर्गिक संसाधन संरक्षण समिती आणि जनसंग्राम परिषदेच्या अभ्यास पथकाने जमिनीशी निगडित कागदपत्रे शोधून काढली. न्यायालयाच्या निर्देशानंतर बळ्ळारीच्या लोकायुक्त पोलिसांनी श्रीरामुलू यांच्यासह इतरांवर आरोपपत्र दाखल केले आहे. हा खटला बंगळूरमध्ये सरकारने स्थापन केलेल्या लोकप्रतिनिधींच्या नियुक्त न्यायालयात वर्ग करण्यात आला होता.

B. Sriramulu
रामदास कदमांचं चाललंय काय? आधी गावचा सप्ताह अन् आता मणक्याच्या दुखण्याचं कारण

मोळकालमुरूचे आमदार आणि मंत्री श्रीरामुलू यांचे २००२ पासूनच्या आरोपपत्रात आरोपी क्रमांक ६ म्हणून नाव आहे. त्यामुळे त्यांनी तातडीनं मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. मंत्र्यांनी खोटी कागदपत्रे तयार करून जमीन ताब्यात घेतली. या जमिनीपैकी १० एकर जागा कर्नाटक सरकारने कालवा बांधण्यासाठी संपादित केली होती. बळ्ळारी येथील मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी बळ्ळारीच्या लोकायुक्त पोलिसांना या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनी (बळ्ळारी) हे प्रकरण ३ मार्च २०२२ रोजी बंगळूर येथील लोकप्रतिनिधींच्या न्यायालयात वर्ग केले, असेही हिरेमठ यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com