Karnataka Elections Result : कर्नाटकातील शेवटच्या जागेसाठी थरारनाट्य सुरूच; भाजप अवघ्या १६ मतांनी आघाडीवर!

Karnataka Assembly Elections Result 2023 : काँग्रेसला मागे पाडून, भाजपने घेतली आघाडी!
Karnataka Assembly Elections Result 2023 :
Karnataka Assembly Elections Result 2023 : Sarkarnama

Karnataka Assembly Elections Result 2023 : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दणदणीत यश मिळाले आहे. तर भाजपचा दारूण पराभव झाला. कर्नाटकच्या एकूण 224 जागांपैकी 223 जागांचे निकाल जाहीर झाले आहे. एकमेव विधानसभा मतदारसंघाचा निकाल अजून लागायचा बाकी आहे. बंगळूरमधील विधानसभा मतदारसंघ क्रमांक 173 जयनगर या जागेचा निकाल अद्याप लागलेला नाही. रात्रीचे एक वाजून गेले तरी अजूनही येथून कोणीही विजयी घोषित झाले नाही.

Karnataka Assembly Elections Result 2023 :
Karnataka Result : कर्नाटकच्या शेवटच्या जागेसाठी काटे की टक्कर; काँग्रेस उमेदवार निसटत्या २९४ मतांनी आघाडीवर !

जयनगर मतदारसंघातून आता भाजपचे उमेदवार सी के रामामुर्ती अवघ्या 16 मतांनी आघाडीवर आहेत. तर या मतदारसंघातून विद्यमान आमदार असणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार सौम्या रेड्डी फक्त 16 मतांनी पिछाडीवर आहेत. भाजप उमेदवार सी के रामामुर्ती यांना 57797 इतकी मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार यांना 57781 इतकी मते मिळाली आहेत. दोन्ही उमेदवाऱ्यांच्या मतांतील फरक फक्त 16 मतांचा आहे.

मागच्या फेरीत काँग्रेसच्या उमेदवार सौम्या रेड्डी 297 मतांनी आघाडीवर होत्या. तर आताच्या ताज्या कलानुसार भाजपचे उमेदवार रामामुर्ती यांनी काँग्रेसच्या उमेदवार सौम्या रेड्डी यांच्यावर मात करत अवघ्या 16 मतांची आघाडी घेतली आहे.

Karnataka Assembly Elections Result 2023 :
Karnataka Election Result : कर्नाटकला सर्वाधिक आमदार देणाऱ्या बेळगावात कुणी मारली बाजी?

रात्रीचे एक वाजून गेले तरी या मतदारसंघाचा निकाल अजूनही जाहीर होत नाही. तूर्तास तरी भाजपच्या उमेदवाराने 16 मतांची आघाडी घेतली आहे. या मतदारसंघाची अधिकृत माहिती व मतांची आघाडी भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या जयनगर मतदारसंघाचा निकाल लागण्यासाठी विलंब का होत आहे, याची माहिती जाणून घेण्यासाठी सरकारनामाने प्रयत्न केला, परंतु अद्यापपर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com