
Karnataka Assembly Elections Result 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुक काँग्रेसने बहुमताने जिंकून भाजपकडून सत्ता हिसकावून घेतली आहे. दरम्यान या निवडणुकीत भाजपने आपल्या मंत्रीमंडळातील ३१ मंत्र्यापैकी २५ मंत्र्यांवर विश्वास दाखवला होता. भाजपने या मंत्र्यांना पुन्हा एकदा उमेदवारी बहाल केली होती.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री व्ही सोमन्ना यांना चामराजनगर आणि वरूणा या दोन्ही मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिले होते. वरूणा मतदारसंघात ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात उभे होते. मात्र भाजपच्या निम्म्या विद्यमान मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
भाजप सरकारमधील जल संपदामंत्री गोविंद करजोल, परिवहन मंत्री बी श्रीरामुलु, गृहनिर्माण मंत्री व्ही सोमना, कायदे मंत्री जे सी मधुस्वामी, उद्योग मंत्री मुरुगेश रुद्रप्पा निरानी, कृषिमंत्री बी सी पाटील, आरोग्य व शिक्षण मंत्री डॉ के सुधाकर, नगर प्रशासन और लघु उद्योगमंत्री एमटीबी नागराज, युवा शक्तिकरण आणि क्रिडामंत्री डॉ केसी नारायणगौड़ा, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी सी नागेश,हातमाग आणि वस्त्रद्योग मंत्री शंकर पाटिल मुनेनकोप्पा या 11 दिग्गज मंत्र्यांना जनतेने पराभवाचा धक्का दिला आहे.
यापूर्वी 2018 च्या कर्नाटक निवडणुकीत 224 जागांच्या विधानसभेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. 104 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसच्या खात्यात 80 जागा आल्या. या निवडणुकीत जेडीएसचे ३७ उमेदवार विजयी झाले होते.
कर्नाटकात यावेळी मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये होती. जनता दल (धर्मनिरपेक्ष) देखील निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावत होता. आप, सपा, बसपा, राष्ट्रवादीसह अनेक छोटे पक्षही रिंगणात होते. अनेक अपक्ष उमेदवारांनीही शड्डू ठोकला होता.
विधानसभेच्या 224 जागांसाठी एकूण 2,615 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये 901 अपक्ष होते. भाजपने सर्व 224 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत, तर काँग्रेसने 221 जागांवर उमेदवार उभे केले होते. जेडीएसचे 208, आम आदमी पार्टीचे 208, बसपचे 127 उमेदवार रिंगणात होते. समाजवादी पक्षाने 14, राष्ट्रवादीने 9 उमेदवार उभे केले आहेत. इतर राजकीय पक्षांचे ६६९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान झाले होते. यावेळी काँग्रेसला कर्नाटकात प्रचंड बहुमतासह 135 जागा मिळाल्या. भाजपला 66 जागांवर समाधान मानावे लागले. याशिवाय जेडीएसने 19 आणि इतरांनी चार जागा जिंकल्या.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.