Karnataka Opinion Poll : कर्नाटकचा सर्वात ताजा सर्व्हे; काँग्रेससाठी धोक्याची घंटा...

Karnataka Assembly Election 2023 : काँग्रेसचा विजयरथ जेडीएस रोखून पुन्हा किंगमेकर बननणार?
Karnataka Assembly Election 2023 : Opinion Poll :
Karnataka Assembly Election 2023 : Opinion Poll : Sarkarnama

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचा प्रचारही उद्या सोमवार 8 मे रोजी सायंकाळी संपणार आहे. गेल्या काही दिवसांत भाजप, काँग्रेस, जेडीएससह सर्वच पक्षांनी आपली पूर्ण ताकद लावली आहे. विविध जनमत चाचण्यांमध्ये काँग्रेसचा सरकार स्थापनेच्या दावा होत आहे, तर भाजपला आपलं सरकार वाचवण्याची आशा आहे.

Karnataka Assembly Election 2023 : Opinion Poll :
Ujwal Nikam on Supreme Court Judgment: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांच्या निकालाबाबत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचे भाष्य

मतदानाच्या काही दिवस अगोदर रविवारी नवा ओपिनियन पोल समोर आला आहे. इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सच्या सर्वेक्षणात काँग्रेससाठी एक आनंदाची बातमी आहे. काँग्रेस हा कर्नाटकतला सर्वात मोठा पक्ष होणार असल्याचा या सर्व्हेत केला गेला आहे.

मात्र, यामध्ये काँग्रेसला एक धक्का देखील बसण्याचं भाकीत केले गेले आहे. इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सच्या ओपिनियन पोलने अंदाज व्यक्त केला आहे की, काँग्रेसला जास्तीत जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे, परंतु बहुमताच्या आकड्यापासून ते थोड्या जागा दूर राहू शकतात.

भाजप, काँग्रेस आणि जेडीएसला किती जागा?

कर्नाटकातील विधानसभेच्या (Karnataka Election) 224 जागांपैकी काँग्रेसला 105 जागा मिळू शकतात, असा अंदाज ओपिनियन पोलमध्ये व्यक्त केला आहे. मागील विधानसभेत काँग्रेसला मिळालेल्या जागांपेक्षा हा आकडा 25 जागांनी अधिक आहे.

दुसरीकडे भाजपला मोठा धक्का बसणार असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. भाजपला 85 जागा मिळू शकतात. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या जागा 19 ने कमी होऊ शकतात. यावेळी जेडीएस पुन्हा एकदा किंगमेकरच्या भूमिकेत असू शकते. सर्वेक्षणात जेडीएसला 32 जागा देण्यात आल्या आहेत.

कुणाला किती जागांचा अंदाज -

काँग्रेस - 105

भाजप- 85

जेडीएस- 32

Karnataka Assembly Election 2023 : Opinion Poll :
Karnataka Election 2023 : राहुल गांधींबाबत सोनिया चिंतीत ; त्यांची गॅरंटी कोण घेणार ? ; भाजपचा मिश्किल सवाल

प्रदेशनिहाय जागांचा अंदाज -

कर्नाटक राज्याच्या प्रदेशनिहाय राजकारणाबाबत बोलायचे झाल्यास, जुने म्हैसूर भागात जेडीएस सर्वात मोठा पक्ष असल्याचे दिसते. येथील 62 जागांपैकी जेडीएसला 28 तर काँग्रेसला 26 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला या ठिकाणी केवळ सात जागा मिळू शकतात.

बॉम्बे कर्नाटक प्रदेशात 50 जागा असून, त्यापैकी भाजपला 29 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 20 आणि जेडीएसला एक जागा मिळू शकते. सीएनएक्स-इंडिया टीव्हीच्या ओपिनियन पोलनुसार, कोस्टल कर्नाटकच्या भागात भाजपला 15 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी काँग्रेसला चार जागा मिळण्याची शक्यता आहे.

इतर भागात किती जागा?

मध्य कर्नाटक प्रदेशाबद्दल बोललो तर येथेही भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याचे दिसते. ओपिनियन पोलनुसार भाजपला एकूण 21 पैकी 13 जागा मिळण्याची शक्यता आहे. इथे काँग्रेसला आठ जागा मिळू शकतात. जेडीएस आणि इतरांचे खाते उघडण्याची शक्यता नाही.

हैदराबाद-कर्नाटक भागात काँग्रेस (Congress) हा सर्वात मोठा पक्ष असल्याचे दिसते. येथे 32 जागा काँग्रेसच्या खात्यात जातील असा अंदाज आहे. त्याचबरोबर भाजपला सहा तर जेडीएसला दोन जागा मिळण्यची शक्यता आहे. या प्रदेशात एकूण 40 जागा आहेत.

ग्रेटर बंगळुरू विभागात भाजपला 15 जागा मिळण्याची शक्यता आहे. हे 2018 च्या तुलनेत चार जागा अधिक आहे. त्याचबरोबर काँग्रेसला 15 जागा मिळू शकतात. दोन जागा जेडीएसच्या खात्यातही जाऊ शकतात.

Karnataka Assembly Election 2023 : Opinion Poll :
Ravindra Dhangekar News : नाना पहिल्यांदा भेटले तेव्हाच म्हणाले, तू आमदार व्हायचं ; धंगेकरांनी सांगितली आठवण!

पोलचा दावा आहे की, हा ओपिनियन पोल 1मे ते 6 मे दरम्यान घेण्यात आला आहे. कर्नाटकातील 112 विधानसभा मतदारसंघात 11200 लोकांशी बोलणे झाले आहे. यामध्ये 5,620 पुरुष आणि 5,580 महिलांचा समावेश होता.

आता पर्यंत घेण्यात आलेल्या सर्व ओपिनियन किंवा जनमत चाचण्यांमध्ये काँग्रेस कर्नाटकमध्ये स्वबळावर बहुमताचा आकडा गाठून, सरकार स्थापन करेल, असा अंदाद बहुतांश ओपिनियन पोलमध्ये व्यक्त केला जात होता. परंतु या ताज्या सर्व्हेत, काँग्रेस मोठा पक्ष म्हणून जरी समोर येत असला, तरी बहुमतामासून काही दूर राहताना दिसत आहे. यामुळे हा या सर्व्हेच्या दाव्यानुसार हा काँग्रेससाठी धक्का देणारी बाब आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com