Karnataka Election : कर्नाटक जिंकण्यासाठी भाजपच्या 54 नेत्यांची फौज तयार; महाराष्ट्रातील सहा नेत्यांवर मोठी जबाबदारी

BJP News : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तब्बल 54 बड्या नेत्यांची फौज तयार केली आहे.
BJP News
BJP NewsSarkarnama

Karnataka News : कर्नाटक विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूक बहुमताने जिंकायची या इराद्याने भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी भाजपने देशातील तब्बल 54 बड्या नेत्यांची फौज तयार केली आहे.

यामध्ये महाराष्ट्रातील सहा मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार राम शिंदे, जयकुमार रावल, योगेश सागर, प्रसाद लाड यांचा समावेश आहे. यांच्यावर वेगवेगळ्या मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

BJP News
Ram Shinde News : कर्नाटक विधानसभेची रणधुमाळी; राम शिंदेंवर भाजपने सोपवली मोठी जबाबदारी!

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजप जोरदार मोर्चेबांधणी करत असून भाजपसाठी अवघड वाटणाऱ्या 54 मतदारसंघात भाजपने एकएका नेत्याची नियुक्ती केली आहे. यामध्ये भाजपचे नेते राम शिंदे यांच्यावर कर्नाटकच्या अनेकल विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

BJP News
Koregaon News : महेश शिंदे म्हणाले, शशिकांत शिंदेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी; अपयश जनतेच्या माथी मारतात...

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 13 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे. 20 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. तर 10 मे रोजी मतदान आणि 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com