पीएसआय भरती गैरव्यवहारातील भाजप नेत्याच्या घरी गृहमंत्र्यांनी झाडली पायधूळ!

पीएसआय भरती गैरव्यवहारातील महिला नेत्याचे भाजपच्या बड्या नेत्यांशी संबंध
पीएसआय भरती गैरव्यवहारातील भाजप नेत्याच्या घरी गृहमंत्र्यांनी झाडली पायधूळ!
Divya Hagaragi News, PSI Bharti Scam NewsSarkarnama

बंगळूर : कर्नाटकातील पोलीस उपनिरीक्षक (PSI) भरती परीक्षा गैरव्यवहारप्रकरणी भाजप (BJP) नेत्या दिव्या हागरगी (Divya Hagargi) यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आले होते. यानंतर गायब झालेल्या हागरगी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर पोलिसांची त्यांचा कसून शोध सुरू केला होता. अखेर त्यांना पुण्यातून अटक झाली आहे. आता त्यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर येत असून, भाजपच्या अनेक बड्या नेत्यांशी असलेले त्यांचे संबंध उघड झाले आहेत. (PSI Bharti Scam News)

दिव्या हागरगी या कळबुर्गीच्या भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. पीएसआय भरती गैरव्यवहार उघड झाल्यानंतर भाजपने त्यांच्यापासून अंतर राखले आहे. त्यांचा पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा भाजपने केला आहे. असे असले तरी पोलीस आणि स्थानिकांना मात्र, त्या भाजपच्या नेत्या असल्याचे स्पष्ट केले आहे. यातच पीएसआय भरती परीक्षेचा निकाल लागल्यानंतर खुद्द गृहमंत्री अरगा जनेंद्र यांनी हागरगी यांच्या घरी भेट दिल्याचे समोर आले आहे. यामुळे खळबळ उडाली असून, या गैरव्यवहारप्रकरणी आता गृहमंत्र्यांकडेही बोट दाखवले जात आहे.

Divya Hagaragi News, PSI Bharti Scam News
पीएसआय भरती गैरव्यवहाराचं पुणे कनेक्शन; भाजपच्या फरार महिला नेत्याला अटक

कर्नाटकातील पोलीस उपनिरीक्षक भरती परीक्षा गैरव्यवहारामुळे वातावरण तापलं आहे. प्रत्येक उमेदवाराकडून लाच म्हणून ६० लाख रुपये घेण्याचा करार झाला होता. या उमेदवारांनी पेपर लिहिण्यासाठी मायक्रो ब्लूटूथचा वापर केल्याची बाब ‘सीआयडी’ तपासात समोर आली होती. या प्रकरणी अडचणीत आल्यानंतर दिव्या हागरगी या फरार झाल्या होत्या. अखेर त्यांनी कर्नाटक पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने पुण्यातून ताब्यात घेतले. या प्रकरणी अटक झालेल्या दिव्या या अठराव्या आरोपी आहेत. याआधी त्यांचे पती राजेश हागरगी यांना अटक करण्यात आला होती पण दिव्या फरार झाल्या होत्या.

Divya Hagaragi News, PSI Bharti Scam News
देशमुखांना दिलासा नाहीच! तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला

गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) याप्रकरणी ज्ञान ज्योती इंग्लिश मीडियम स्कूलच्या अध्यक्षा दिव्या हागरगी, शाळेचे मुख्याध्यापक काशिनाथ, अर्चना आणि शांतीबाई या शिक्षिका आणि कनिष्ठ अभियंता मंजुनाथ मेळकुंडी यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्याची मागणी न्यायालयाला केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करून या आरोपींच्या विरोधात अटक वॉरंट काढले होते. तसेच, आरोपींना एका आठवड्यात तपास यंत्रणेसमोर शरण येण्याचे निर्देशही दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.