Supreme Court : सत्तासंघर्षावर उद्या पुन्हा सुनावणी; कपिल सिब्बल युक्तीवाद करणार...

Shivsena News : ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला.
Supreme Court Hearing News
Supreme Court Hearing NewsSarkarnama

Supreme Court hearing : राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणीला आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पार पडली. आज बुधवारी राज्यपालांतर्फे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सुरुवातीला युक्तिवाद केला. त्यांच्या युक्तीवादावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला.

सिब्बल आपल्या युक्तीवादात म्हणाले, लोकशाहीत केवळ आकडे महत्त्वाचे नाही, सदस्यांपेक्षा राजकीय पक्षांना अधिक महत्त्व दिले गेले पाहिजे. निवडून आलेल्या आमदारांची/ सदस्यांची पक्ष हीच ओळख असते. त्यांना स्वत:ची स्वतंत्र अशी ओळख नसते.

Supreme Court Hearing News
Supreme Court : ...अन्यथा आयाराम, गयारामचे युग येईल; सिब्बलांचा जोरदार युक्तीवाद

समजा एखाद्या पक्षात 5 सदस्य आहे. त्यापैकी दोघे राज्यपालांकडे गेले व म्हणाले, आमचा सरकारला पाठिंबा नाही. अशा वेळी राज्यपाल बहुमत चाचणीचे आदेश देऊ शकतात का, असा महत्त्वाचा सवाल त्यांनी केला. सिब्बल पुढे म्हणाले, लोकशाही म्हणजे केवळ आकडे नाही. राज्यपाल, विधिमंडळ अध्यक्षांनी केवळ आमदारांच्या आकड्यांना नव्हे तर राजकीय पक्षालाही महत्त्व दिले पाहीजे. आमदार ज्या तिकिटावर निवडून आले, त्या पक्षापेक्षा ते महत्त्वाचे नसल्याचेही सिब्बल म्हणाले. यासाठी राज्यपालांनी आमदारांना नव्हे तर राजकीय पक्षाला जास्त महत्त्व दिले पाहीजे. अन्यथा आयाराम, गयारामचे युग येईल, असेही सिब्बल म्हणाले.

सिब्बल पुढे आपल्या युक्तीवादात म्हणाले, प्रतोद कोण याच्याशी राज्यपालाना काहीही घेणेदेणे नाही. खरी शिवसेना कोण आहे, याचा निर्णय घेवून या असे राज्यपालांनी सांगायला पाहिजे होते. 34 जण आयोगाकडे गेले असते तर आपोआपच ते अपात्र झाले असते. मात्र, त्यावेळी तसे झाले नाही. राज्यपालांनी या बंडखोरांना निवडणूक आयोगाकडे पाठवायला हवे होते, असा युक्तीवाद करत सिब्बल यांनी शिंदे गट आणि राज्यपालांच्या वतीने युक्तीवाद केलेल्या तुषार मेहता यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

Supreme Court Hearing News
Supreme Court News: शिंदे सरकारचे टेन्शन वाढले? सरन्यायाधीशांचे राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्न; बाजी पलटणार का?

उद्या या प्रकरणात पुन्हा सुनावणी होणार आहे. उद्या कपिल सिब्बल युक्तीवाद करणार आहेत. त्यानंतर या प्रकरणातील सुनावणी पूर्ण होईल. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाचा निर्णय येवू शकतो. किंवा निर्णय राखून ठेवला जाऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com