Kapil Sibal Furious On Digvijay Singh: जर्मनीचे आभार मानणाऱ्या दिग्विजय सिंहांवर का भडकले कपिल सिब्बल..

Kapil Sibal News: आपली लढाई ही आपल्याशीच आहे
Kapil Sibal - Rahul Gandhi - Digvijay Singh
Kapil Sibal - Rahul Gandhi - Digvijay SinghSarkarnama

Kapil Sibal Tweet: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दोषी ठरवणाऱ्या निकालाची तसेच, त्यांची खासदारकी रद्द केल्याच्या घटनेची आम्ही दखल घेतली आहे. या प्रकरणामध्ये न्यायालयीन स्वातंत्र्य आणि लोकशाही तत्त्व या दोन्हींचे पालन होणे अपेक्षित होते, अशी टिप्पणी जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने नुकतीच केली आहे.

देशांतर्गत लोकशाहीचे प्रश्न सोडवण्यासाठी इतर राष्ट्रांच्या मदतीची गरज नाही. त्यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली नव्हती, असे स्पष्टीकरण राहुल गांधींनी दिले असतानाही, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधींच्या प्रकरणाची दखल घेतल्याबद्दल जर्मनीचे आभार मानले. दिग्विजय यांच्या ट्वीटमुळे भाजपच्या हाती कोलित मिळाले. भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केले आहे.

Kapil Sibal - Rahul Gandhi - Digvijay Singh
Lalit Kumar Modi Tweet : मोदींकडून नेहरुंचा तो फोटो शेअर ; नव्या वादाला तोंड फुटलं ; काँग्रेस आक्रमक..

प्रसिद्ध वकील, काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी दिग्विजय सिंह यांच्या या विधानावरुन त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी टि्वट करीत दिग्विजय सिंह यांच्यावर निशाना साधला आहे.

"दिग्विजय सिंह, देशातील लोकशाहीसाठी कशाप्रकारे तडजोड केली जात आहे, यावर लक्ष केंद्रीय करण्याऐवजी तुम्र्मही जर्मनीला धन्यवाद दिले. मला वाटलं की आम्हाला पुढे जाण्यासाठी अशा प्रकारचा गरज नाही, आम्हाला विदेशी समर्थनाची गरज नाही. आपली लढाई ही आपल्याशीच आहे. यात आपण सोबत आहोत,"

Kapil Sibal - Rahul Gandhi - Digvijay Singh
Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटकच्या रणधुमाळीत हे मुद्दे चर्चेत..

‘देशाच्या अंतर्गत घडामोडींमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी परराष्ट्रांना आमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद’, असे ट्वीट भाजपचे नेते किरण रीजिजूंनी केले. तर ‘देशाच्या लोकशाहीशी निगडित प्रश्न, राजकीय तसेच कायद्याशी संबंधित समस्या सोडवण्याची क्षमता राहुल गांधी आणि काँग्रेसकडे नसल्याने परराष्ट्रांच्या हस्तक्षेपाची मागणी केली जात आहे’, असा आरोप अनुराग ठाकूर यांनी केला.

दिग्विजय सिंह यांच्या नव्या वक्तव्यापासून काँग्रेसने स्वत:ला अलिप्त ठेवले. पक्षाचे माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश यांनी कोणाचेही नाव न घेता, देशांतर्गत लोकशाहीसंबंधित प्रश्न लोकशाही मार्गाने सोडवले जावेत यावर काँग्रेसचा ठाम विश्वास आहे असे ट्वीट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com