काहीही न करता एवढे पैसे कसे कमवता? या प्रश्नावर राज कुंद्रा फक्त हसला होता - Kapil Sharma and Raj Kundras video viral amit kundras arrest-rm82 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

काहीही न करता एवढे पैसे कसे कमवता? या प्रश्नावर राज कुंद्रा फक्त हसला होता

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 जुलै 2021

राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे.

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती व उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) याला मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे. पॉर्न फिल्मची निर्मिती केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर राज कुंद्राचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कॉमेडियन कपिल शर्मा यांच्या शोमधील आहे. काहीही न करता एवढे पैसे कसे कमवता, हा प्रश्न कुंद्रा याला विचारण्यात आला होता. (Kapil Sharma and Raj Kundras video viral amid kundras arrest)

राज कुंद्रा याच्या विरोधात पुरेसे पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने पोलिसांनी पावले टाकली आहेत. पॉर्न व्हिडीओ बनवून ते ऑनलाईन अपलोड करणा-या रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांच्या  गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने राज कुंद्रा याला अटक केली.

हेही वाचा : ऑपरेशन कमळ : मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्र्यांवरही होती पाळत

पॉर्नोग्राफी प्रकरणात तो मुख्य सूत्रधार आहे. त्यानंतर कुंद्राचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मागील वर्षीचा आहे. राज कुंद्रासह पत्नी शिल्पा शेट्टी हे कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये आले होते. यावेळी कपिल शर्माने गंमतीमध्ये कुंद्राला काहीही काम न करता इतका पैसा कसं कमावता, असा प्रश्न विचारला होता. 

'तुम्हाला कुठे ना कुठे फिल्म स्टार्ससोबत फुटबॉल मॅच खेळताना दिसता. कधी फ्लाईटमध्ये दिसतील. कधी काही बातमी आली आहे तर दिसतात. कधी कुठे फिरताना तर कधी शिल्पाला शॉपिंगला घेऊन जाताना दिसता. आम्हाला आयडिया सांगा, काहीही न करता पैसे कसे कमावता? तुम्ही याच कामांत व्यस्त असता,' असं कपिल शर्मा कुंद्राला विचारताना या व्हिडीओत दिसत आहे. या प्रश्नावर कुंद्रासह शिल्पा शेट्टीही जोरजोरात हसताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत काहींनी कपिल शर्माच्या या प्रश्नाचं उत्तर आता समजलं, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

हेही वाचा : स्मृती इराणी, वसुंधरा राजे याही हेरगिरीच्या भोवऱ्यात

दरम्यान, चित्रपटाच्या शूटिंगच्या नावाखाली मढ बेटावरील खासगी बंगल्यांमध्ये वेश्याव्यवसाय आणि पॉर्न व्हिडीओचे शूटिंग होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या फेब्रुवारीमध्ये या बंगल्यांवर छापे टाकले होते. तरुण मुलींना चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून काही टोळ्या अश्लील व्हिडीओमध्ये काम करायला लावत होत्या. या छाप्यादरम्यान पोलिसांनी दोन मुलींची सुटका केली होती. 

त्यावेळी छाप्यात पोलिसांनी उमेश कामत, यास्मीन बेग खान, प्रतिभा नलावडे, मोनू गोपालदास जोशी, भानुसूर्यम ठाकूर आणि मोहम्मद आसिफ यांना अटक केली होती. त्यात पुढे गहना वशिष्ठ आणि सागरिका शोना सुमन यांनाही अटक करण्यात आली होती. फेब्रुवारी 2021 मध्ये घडलेल्या या गुन्ह्याचा पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर या संपूर्ण गुन्ह्यामागे मुख्य आरोपी उद्योगपती राज कुंद्रा असल्याचे समोर आले होते.  

पोलिसांनी चौकशीसाठी कुंद्राला समन्स बजावले होते. त्यानुसार काल (ता.19) कुंद्रा याची चौकशीसाठी हजर झाला. त्याची चौकशी करुन त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, कुंद्रा याने या प्रकरणात त्याचा कोणताही सहभाग नसल्याचा दावा केला आहे. त्याला 23 तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख