राज्यसभेसाठी काँग्रेसकडून 'या' नावांची चर्चा ; सोनिया गांधी घेणार अंतिम निर्णय

युवा नेत्याला राज्यसभेत पाठविण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली सुरु आहेत.

Kanhaiya Kumar, Imran Pratapgarhi,  BV Srinivasa
Kanhaiya Kumar, Imran Pratapgarhi, BV Srinivasasarkarnama

मुंबई : सध्या राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. शिवसेनेकडून संजय राऊत व संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसकडून विविध नावांची चर्चा सुरु आहे. युवा नेत्याला राज्यसभेत पाठविण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली सुरु आहेत.

राज्यसभेच्या निवडणुका या 10 जूनला होणार आहेत. त्यानिमित्तानं ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar), इम्रान प्रतापगढी (Imran Pratapgarhi) आणि बी.व्ही. श्रीनिवास (B.V. Srinivas) यांच्या नावाची काँग्रेसच्या गोटात चर्चा सुरु असल्याचे माहिती सुत्रांनी दिली.

काँग्रेस नेता कन्हैया कुमार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते बी. व्ही. श्रीनिवास यांच्या नावातील एक नाव निश्चित होईल अशी माहिती, सुत्रांनी दिली.

तर दुसरीकडे आगामी राज्यसभा निवडणुकीनंतर संपूर्ण गांधी परिवार आता संसदेच्या सभागृहात दिसणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना राज्यसभेत पाठवण्यासाठी काँग्रेसच्या एका गटाकडून लॉबिंग सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सध्या जरी प्रियंका गांधींच्या नावाची चर्चा सुरु असली तरी अंतिम निर्णय या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी घेणार आहेत.


Kanhaiya Kumar, Imran Pratapgarhi,  BV Srinivasa
सगळीकडे ढवळाढवळ करण्याचा अधिकार विश्व प्रवक्त्यांना कुणी दिला ? चंद्रकांतदादांचा सवाल

राज्यसभेच्या उमेदवारीवरून राज्यातील राजकारण तापलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जबाबदार ठरले आहे. उमेदवारीबाबतचा ड्राफ्ट तयार झाला होता. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दिलेला शब्द मोडला, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. ही माघार नाही, माझा स्वाभिमान आहे, असंही संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यानंतर संभाजीराजे यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यादरम्यानच्या काळात घडलेल्या घडामोडींवर त्यांनी जाहीरपणे भाष्य केले. राज्यसभेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर मी मुंबईत आलो. माझी बोलायची मुळीच इच्छा नाही. माझ्या रक्तात, तत्वात ते नाही. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगू इच्छितो, छत्रपती शिवाजी महाराजांचे कुठलंही स्मारक, पुतळा असेल तर दोघांनी तिथं जायचं. जर संभाजीराजे छत्रपती खोटं बोलत असेल तर सांगावं, असं सुरूवातीला संभाजीराजे यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com