ठरलं ! आता कंगना राणावत करणार 'राष्ट्रवादींचा' प्रचार
Kangna Ranout/ InstagramSarkarnama

ठरलं ! आता कंगना राणावत करणार 'राष्ट्रवादींचा' प्रचार

केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कंगनाने पाकिस्तानी, खलिस्तानी म्हटले होते.

नवी दिल्ली : आपल्या बेताल वक्तव्यांनी प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranout) आता निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे. याबाबत तिने नुकतीच महत्त्वाची घोषणा केली आहे. जो पक्ष राष्ट्रवादी असेल त्याला मी पाठिंबा देईन, असे कंगनाने म्हटंल आहे.

कंगना राणावतने आज उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) वृंदावन (Vrundavan) येथील ठाकूर बांके बिहारी मंदिरात मंदिरात पूजापाठ करून बांके बिहारींचे आशीर्वाद घेतले. तर दुसरीकडे कंगनाच्या आगमनाची बातमी पसरताच रस्त्यावर बघ्यांची गर्दीही जमली होती.

Kangna Ranout/ Instagram
वाढता वाढता वाढे! 'सीएनजी'वर गाडी चालवणंही आता झालं महाग

देवाचे दर्शन घेतल्यानंतर कंगनाने स्थानिक माध्यमांशी संवाद साधताना ही घोषणा केली. पत्रकारांनी कंगनाला निवडणुकीत कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार असा प्रश्न केला. याला उत्तर देताना कंगना म्हणाली, "मी राष्ट्रवादीचा प्रचार करेन. मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही आणि निवडणूकीत जे पक्ष राष्ट्रवादी आहेत त्याच पक्षाला पाठिंबा देईन," असे कंगनाने म्हटले आहे.

दरम्यान, कडेकोट सुरक्षा व्यवस्थेनंतर कंगनानेही मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यांच्या मनात चोर आहे, त्यांना तिचात्रास होईल, तिची वक्तव्ये टोचतील, पण तिच्या बोलण्याने खरे देशभक्त खूश होतील, असे म्हणत कंगनाने पुन्हा एकदा डिवचले आहे.

खरंतर, कंगना राणावतचा बांके बिहारी भेटीचा कार्यक्रम गोपनीय होता. मात्र, जमाव अनियंत्रित झाल्यानंतर कंगनाच्या सुरक्षेसाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. दरम्यान केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाकिस्तानी, खलिस्तानी म्हणाऱ्या कंगनाच्या विरोधात काही शीख संघटनांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

हे प्रकरण ताजे असताना ती नुकतीच पंजाबला गेली असता पंजाबमध्ये कंगनाच्या गाडीला काही शेतकऱ्यांनी घेराव घालून मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. 'पंजाबमध्ये प्रवेश करताच शेतकऱ्यांना माझ्या गाडीवर जमावाने हल्ला केला. हिमाचल प्रदेशातून पंजाबमध्ये पोहोचल्यावर शेतकऱ्यांनी तिच्या कारला घेराव घातला. ते स्वत:ला शेतकरी म्हणवून घेत आहेत आणि माझ्यावर हल्ला करत आहेत, घाणेरड्या शिवीगाळ करत आहेत, मला जीवे मारण्याची धमकी देत ​​आहेत. या देशात मॉब लिंचिंगचे प्रकार सर्रास घडत आहेत. आज पोलीस नसते तर माझंही मॉब लिचिंग झालं असतं असं तिनं म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.