इम्राम खान यांची इनिंग संपणार ; लष्करानेही साथ सोडली, खुर्ची सोडण्याचा सल्ला

इम्रान यांच्या विरोधात एकत्र आलेले विरोधक सोमवारपासून संसदेचे अधिवेशन बोलवण्याची मागणी करत आहेत, ज्यामध्ये अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार आहे.
kamar bajwa, imran khan
kamar bajwa, imran khansarkarnama

इस्लामाबाद : पाकिस्तानात लष्कराच्या मदतीने इम्रान खान (imran khan)पंतप्रधान बनले आहे. पण इम्रान आणि लष्करातील मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर आता इम्रान यांचा खेळ संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण आता लष्करानेही इम्रानची सोबत सोडली असल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी लष्कराच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने इम्रान यांना ओआयसीच्या बैठकीनंतर राजीनामा देण्यास सांगितले आहे. (kamar bajwa advises pm imran khan to resign)

लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा (kamar bajwa) यांनी शनिवारी पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतली. बाजवा यांनी इम्रान यांना देशाला संघर्ष आणि हिंसाचाराच्या मार्गावर नेण्यापासून दूर राहण्यास सांगितले. देशातील महागाई, स्वकीय खासदारांचे बंड आणि विरोधी पक्षाच्या राजकारण आदी कारणामुळे इम्रान खान यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला आहे.

राजकारणापासून तटस्थपणे दिसणारे पाकिस्तानी लष्कर अचानक पहिल्यांदाच सक्रिय झाले आहेत. इम्रानच्या पक्षाच्या सदस्यांनी सिंध हाऊसवर केलेल्या हल्ल्यावर लष्करप्रमुखांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बाजवा यांनी खान यांना खुर्ची सोडण्यास सांगून त्यांच्या जागी त्यांच्याच पक्षाचा दुसरा नेता पंतप्रधान म्हणून नियुक्त करावा, असे म्हटले आहे.

इम्रान यांनी जनरल बाजवा आणि गुप्तचर अधिकारी लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम यांची भेट घेतली होती. यानंतर बाजवा आणि तीन वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी इम्रान यांना राजीनामा देण्यास सांगितले.

मंगळवारपासून ओआयसीच्या परराष्ट्र मंत्र्यांची दोनदिवसीय बैठक होणार आहे. इम्रान यांच्या विरोधात एकत्र आलेले विरोधक सोमवारपासून संसदेचे अधिवेशन बोलवण्याची मागणी करत आहेत, ज्यामध्ये अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार आहे. अन्यथा संसदेत बसून ओआयसीच्या बैठकीत अडथळा निर्माण करण्याची धमकी त्यांनी दिली आहे.

kamar bajwa, imran khan
पार्थ पवारांना मुख्यमंत्र्यांनी 'मावळ' द्यावा, बारणेंना राज्यसभेवर पाठवा!

३४२ सदस्यसंख्या असलेल्या पाकिस्तानच्या कायदेमंडळात बहुमत मिळवण्यासाठी १७२ सदस्यांना पाठिंबा असणे आवश्यक आहे. इम्रान खान यांच्या तहरिक- ए- इन्साफ या पक्षाचे १५५ सदस्य असून सरकार स्थापन करताना सहा लहान पक्षांच्या २३ सदस्यांनी पाठिंबा दिला होता. मात्र हे पक्षही आता इम्रान खान यांच्या सरकारवर नाराज असून त्यांनी बंडखोरीचे हत्यार उपसले आहे. खान यांच्या पक्षाच्या २४ खासदारांनी अविश्वास प्रस्तावाबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याने सध्या पाकिस्तानातील इम्रान खान सरकार पडण्याचे संकेत दिसू लागले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com