भाजपचा बडा नेता नाराज! पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीलाच दांडी

भाजप कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत आजपासूुन सुरू होत आहे.
K S Eshwarappa
K S Eshwarappa Sarkarnama

नवी दिल्ली : भाजप (BJP) कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक आजपासून कर्नाटकात (Karnataka) होत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत ही बैठक होत असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते के. एस. ईश्वरप्पा (K. S. Eshwarappa) यांनी या बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. कंत्राटदार संतोष पाटील (Santosh Patil) आत्महत्या प्रकरणी अडचणीत आलेल्या ईश्वरप्पांना मंत्रिपद गमावावे लागल्याने ते नाराज असल्याचे समजते. (Santosh Patil Death Case News)

होस्पेट येथे आज आणि उद्या होणाऱ्या पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीला उपस्थित न राहण्याची घोषणा ईश्वरप्पा यांनीच केली आहे. यासाठी त्यांनी व्यक्तिगत कारण पुढे केलवे आहे. पक्षाने मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव आणल्याने ते नाराज असल्याचे समोर येत आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझ्या नातवाचे लग्न असून, त्या निमित्ताने घरी अनेक कार्यक्रम आहेत. त्यामुळे मी बैठकीला उपस्थित राहू शकत नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना मी निर्णय कळवला आहे.

K S Eshwarappa
मी पुन्हा येईन! राजीनामा देताच भाजपच्या बड्या नेत्याची घोषणा

संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी सरकारवर नामुष्की ओढवली आहे. भाजपचा कार्यकर्ता असलेल्या कंत्राटदाराने सरकारमधील एका मंत्र्यावर आरोप करून आत्महत्या केल्याने भ्रष्टाचाराचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला आहे. सुरवातीला या प्रकरणी सरकारने ईश्वरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासही नकार दिला होता. अखेर दबाव वाढल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ईश्वरप्पांचा राजीनामा घेणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती. नंतर काही तासांतच ईश्वराप्पांचा राजीनामा घेणार असल्याचे जाहीर करण्याची वेळ त्यांच्यावर आली.

K S Eshwarappa
खामोश! तृणमूलनं कधीच न जिंकलेल्या जागेवर तीन लाखांच्या मताधिक्यानं मोठा विजय

बेळगाव येथील संतोष पाटील यांच्या कुटुंबीयांना ईश्वरप्पा यांच्याविरोधात तक्रार केली आहे. त्यानुसार ईश्वरप्पा यांच्यासह आणखी दोघांवर संतोष यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पाटील हे कंत्राटदार होते. तसेच हिंदू युवा वाहिनीचे राष्ट्रीय सचिव आणि भाजपचे कार्यकर्तेही होते. उडपी येथील एका हॉटेलमध्ये 12 एप्रिलला त्यांचा मृतदेह आढळून आला होता. ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मागील काही दिवसांपासून ते बेपत्ता होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com