मुख्यमंत्रीच म्हणाले, नवे संविधान हवे! के. चंद्रशेखर राव घेणार उद्धव ठाकरेंची भेट

उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट घेणार असून त्यांच्याशी फोनवर चर्चा झाल्याचे राव यांनी सांगितले.
Uddhav Thackeray, K. Chandrashekar Rao
Uddhav Thackeray, K. Chandrashekar RaoSarkarnama

नवी दिल्ली : देशातील काही नेत्यांकडून अनेकदा संविधान (Constitution) बदलण्याची भाषा केली जाते. पण आता थेट मुख्यमंत्र्यानीच ही भाषा सुरू केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांनी देशात नवा विचार, नवे संविधान आणण्याची आवश्यकता असल्याचे वक्तव्य केले आहे. तसेच केंद्रातील मोदी सरकारला (Modi Government) बंगालच्या उपसागरात फेकून देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले आहेत.

के. चंद्रशेअर राव यांची तेलंगणामध्ये सत्ता आहे. भाजपला (BJP) ते सातत्याने जोरदार विरोध करतात. त्यातच त्यांच्या या वक्तव्याने मोठा वाद ओढवून घेतला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, देशातील नेतृत्वामुध्ये गुणात्मक बदल होण्याची गरज आहे. मी मुंबईला (Mumbai) जाऊल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहे. आपल्या संविधान नव्याने लिहावे लागेल. नवा विचार, नवे संविधान आणायला हवे, असं राव म्हणाले आहेत.

Uddhav Thackeray, K. Chandrashekar Rao
सव्वीस वर्षांच्या राजकारणानंतर सुरेश प्रभुंची मोठी घोषणा; आता फक्त एकच ध्येय...

उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट घेणार असून त्यांच्याशी फोनवर चर्चा झाल्याचे राव यांनी सांगितले. देशातील सध्याच्या स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी निवृत्त आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकाऱ्यांची हैदराबादमध्ये बैठक आयोजित केली जाणार आहे. भाजपशी लढण्यासाठी देशातील समविचारी नेत्यांना एकत्र करणार असल्याचे राव यांनी स्पष्ट केलं आहे.

राव यांनी भाजपवरही टीका केली आहे. केंद्रातील भाजपला हटवून बंगालच्या उपसागरात फेकायला हवे. देशासाठी जे करण्याची गरज आहे ते सर्वकाही आम्ही करू. आम्ही शांत बसणार नाही. ही लोकशाही आहे. आपल्या पंतप्रधानांना दुरदृष्टी नाही, अशा शब्दांत राव यांनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. आपण पंतप्रधान बनण्यासाठी लढत नसून देशात बदल घडवण्यासाठी लढत राहणार असल्याचेही ते म्हणाले.

देशात बदल घडवण्याची गरज आहे. देशात क्रांतीची गरज आहे. आपण लढल्याशिवाय बदल घडणार नाही. सिंगापूर सरकारकडे काहीच नाही, पण मेंदू आहे. आपल्या सरकारकडे सर्वकाही आहे पण मेंदू नाही. भाजपकडून अर्धसत्य सांगत लोकांना विभागले जात आहे. एससी आणि एसटी समाजाकडे देशात खूप दुर्लक्ष करण्यात आल्याची खरमरीत टीकाही राव यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com