जे.पी. नड्डा म्हणतात, दिलेला शब्द पाळणारा भाजप हा देशातील एकमेव पक्ष...

J.P. Nadda : कॉंग्रेस केवळ बहिण-भावाचा पक्ष म्हणून तग धरून आहे.
Narendra Modi, Amit Shah, J.P. Nadda Latest News
Narendra Modi, Amit Shah, J.P. Nadda Latest Newssarkarnama

नवी दिल्ली : देशातील अनेक राजकीय पक्षांचे स्वरूप कालौघात बदलले. डावे हे डावे राहिले नाहीत, कॉंग्रेस केवळ बहिण-भावाचा पक्ष म्हणून तग धरून आहे, समाजवादी समाजवादच विसरले, पण भारतीय जनता पक्षाने तब्बल ७ दशकांपासून आपली एकच विचारधरा कायम ठेवली आहे व हेच वैशिष्ट्य घेऊन भाजप (BJP) दिल्लीकरांचा कौल मागेल, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J.P. Nadda) यांनी आगामी दिल्ली महापालिका निवडणुकीचा शंखनाद केला. भाजपच्या पंच परमेश्वर संमेलनात ते बोलत होते. (Narendra Modi, Amit Shah, J.P. Nadda Latest News)

Narendra Modi, Amit Shah, J.P. Nadda Latest News
मराठा समन्वयक रमेश केरेंचा विष घेत आत्महत्येचा प्रयत्न...

भाजपच्या दिल्लीतील लाखो बूथ प्रमुखांसह गर्दी जमविण्यात भाजपला यश मिळाले. भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने आज नड्डा यांची सभा ठेवून दिल्लीत पहिली चाचपणी केली व प्रत्यक्ष निवडणुकीत भाजप नेतृत्व स्वतः प्रचारात उतरेल, अशी चिन्हे आहेत.

नड्डा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' हे लक्ष्य साकार केले आहे. कित्येक पक्षांनी आपली विचारसरणी बदलली व मूळ विचारांना, कार्यशैलीला तिलांजली दिली. त्याच वेळी एकाच वेळी देशात 'दो निशान, दो विधान, दो विधान' चालणार नाही हा १९५१-५२ चा निर्धार २०२२ मध्ये पूर्ण करणारा, दिलेला शब्द पाळणारा भाजप देशातील एकमेव पक्ष आहे. आम्ही काश्मीरसाठीचे कलम ३७० रद्द करून आमचा शब्द खरा केला. जनसंघापासून भाजप विचारांवर कायम व ठाम उभा आहे. मोदींच्या नेतृत्वात देश सशक्त आर्थिक शक्ती म्हणून जगात पुढे आला आहे.

Narendra Modi, Amit Shah, J.P. Nadda Latest News
Andheri Election : राज ठाकरेंच्या पत्रावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया..

दिल्लीत रामलीला मैदानावर स्वतःला मोठे म्हणवणाऱ्या राजकीय पक्षांच्या जाहीर सभांना जेवढी गर्दी जमते तेवढी गर्दी तर आमच्या कार्यकर्ता संमेलनाला जमली आहे, असा टोला नड्डा यांनी कॉंग्रेस व आपला लगावला. ते म्हणाले की, समर्पित कार्यकर्ते ही भाजपची ताकद आहे. भाजप हा केडर व वैचारिक अधिष्ठान असलेला पक्ष आहे. पंच परमेश्वर संमेलनात प्रत्येक बूथवरील अगदी प्रमुख कार्यकर्ते बोलावले आहेत. बूथ समित्यांच्या कार्यकर्त्यांना बोलावले असते तर आजच्या संमेलनाची संख्या ५ लाखांवर गेली असती, असेही नड्डा म्हणाले.

दरम्यान, दिल्लीतील तीन महापालिकांची निवडणूक रद्द करून एकच महापालिका केल्यावर प्रथमच होणाऱ्या या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा सत्तारूढ आप व भाजप यांच्यात थेट लढत होणार आहे. भाजपने दारू घोटाळा, अबकारी धोरण, बसखरेदीतील कथित घोटाळा यावरून केजरीवाल यांचे उजवे हात असलेले मनीष सिसोदिया यांना लक्ष्य केले आहे. सिसोदीया यांचा आजच केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नव्याने नोटीस बजावून उद्या हजर राहण्यास सांगितले आहे. सिसदिया यांना उद्या सीबीआय अटक करेल, असे आपने म्हटले आहे. सिसोदिया, सत्येंद्र जैन व आपच्या दिल्लीतील मंत्र्यांवर मोदी सरकार सूडबुध्दीने कारवाई करत असल्याचा आपच्या आरोपाला दिल्लीकरांचा प्रतिसाद मिळत असल्याचेही आपचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने पंच परमेश्वर संमेलनाद्वारे दिल्लीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com