राष्ट्रपती निवडणूक : नड्डा अन् राजनाथ सिंहांवर भाजपकडून मोठी जबाबदारी

नव्या राष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
राष्ट्रपती निवडणूक : नड्डा अन् राजनाथ सिंहांवर भाजपकडून मोठी जबाबदारी
Defence Minister Rajnath Singh, J P Nadda latest NewsSarkarnama

नवी दिल्ली : विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदाची मुदत २४ जुलैला संपत असल्याने नव्या राष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी भाजपसह विरोधकांकडूनही आता चाचपणी सुरू करण्यात आली आहे. या चर्चेतच भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Presidential Election Latest Marathi News)

राष्ट्रपती पदासाठी 18 जुलै रोजी मतदान असून 21 जुलै रोजी मतमोजणी आहे. तर 29 जूनपर्यंत अर्ज भरण्याची अखेरची मुदत आहे. त्यामुळे आता उमेदवार कोण असणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. भाजपकडून या निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्यात आली असून त्याची जबाबदारी नड्डा व राजनाथ सिंह यांच्यावर टाकली आहे.

Defence Minister Rajnath Singh, J P Nadda latest News
जिल्हाधिकाऱ्यांच्या आजारी गायीसाठी सात डॉक्टरांची ड्युटी; दिवसांतून दोनदा तपासणीचे आदेश

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सर्वानुमते एकच उमेदवार देण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत. त्यासाठी एनडीएतील सर्व घटक पक्ष, युपीएतील सर्व पक्ष तसेच इतर पक्ष आणि अपक्षांशी चर्चा करण्याची जबाबदारी दोघांवर टाकण्यात आली आहे.

दरम्यान, विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केरळचे राज्यपाल अरिफ महमंद खान, छत्तीसगडच्या राज्यपाल अनूसुया उईके यांची राष्ट्रपतीपदासाठी तर केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नक्वी तसेच सुमित्रा महाजन यांच्या नावाची उपराष्ट्रपतीपदासाठी चर्चा आहे. मात्र, राष्ट्रपतीपदासाठी यापैकी कुणाचे नाव अंतीम होणार की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेहमीच्या धक्कातंत्राप्रमाणे यापेक्षा नवीच नावे समोर येतात याचीही चर्चा सुरू झाली आहे.

गेल्यावेळी वेगवेगळी नावे चर्चेत होती. मात्र, अचानकपणे तेव्हाचे बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यामुळे यावेळीदेखील चर्चेतील नाव अंतीम होणार की अचानकपणे आणखी नवे नाव समोर येणार याचीच चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली आहे. राष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उपराष्ट्रपतीपदाची निवड प्रकिया होणार असली तरी उपराष्ट्रपती कोण याचीही चर्चा जोरात सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in