EDने पत्रकार राणा अयुब यांनी परदेशात जाण्यापासून रोखलं

अयुब यांच्याकडून १.७७ कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त केली आहे.
EDने पत्रकार राणा अयुब यांनी परदेशात जाण्यापासून रोखलं
Rana Ayubsarkarnama

मुंबई : मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पत्रकार राणा अयुब (Rana Ayub)यांच्यावर यापूर्वी कारवाई केली आहे. अयुब यांच्याकडून १.७७ कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त केली आहे. आता त्यांना परदेशात जाण्यापासून रोखले. याबाबत अयुब यांनी टि्वट करुन त्यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत माहिती दिली आहे. (Journalist Rana Ayub news update)

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अधिकाऱ्यांनी ईडी (ED)ने जारी केलेल्या ‘लुक आउट परिपत्रक’च्या पार्श्वभूमीवर त्यांना परदेशात जाण्यापासून थांबविले. केंद्रीय तपास एजन्सीला अयुब (३७) यांची चौकशी करायची आहे आणि त्यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांचे म्हणणे नोंदवायचे असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अयुब यांनी ट्विट करून या घटनेची माहिती दिली आहे.

''अयुब यांनी नोटिशीचे पालन केले नाही आणि एजन्सीला त्याने देश सोडावा असे वाटत नाही. कारण त्यामुळे तपास आणि त्यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यास विलंब होऊ शकतो,'' असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Rana Ayub
भाजप आमदारानं भर सभेत फडणवीसांसमोरच महापालिका अधिकाऱ्यांना सुनावले

आपल्या टि्वटमध्ये अयुब म्हणतात, ''पत्रकारांना धमकावण्याच्या विषयावर ICFJ मध्ये माझे भाषण देण्यासाठी मी लंडनला माझ्या फ्लाइटमध्ये जात असताना मला आज भारतीय इमिग्रेशनमध्ये थांबवण्यात आले. भारतीय लोकशाहीवरील पत्रकारिता महोत्सवाला संबोधित करण्यासाठी मी इटलीला जाणार होते,''

तहलका मासिकात राणा अयुब या पत्रकार होत्या. मात्र तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप झाल्यानंतर अयुब यांनी तेथून राजीनामा दिला. तेव्हापासून स्वतंत्र पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी सर्व वृत्तपत्रे व मासिकांतून लेख लिहिण्यास सुरुवात केली आहे.

Rana Ayub
राऊतांचे मौन : मनसेचं टि्वट, आघाडी सरकार म्हणजे 'अमिताभ-जया-रेखा' यांचा 'सिलसिला'

ईडीने अयुब यांना 1 एप्रिलला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे, ईडीने या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या बँकेतील 1.77 कोटी रुपयांहून अधिक ठेवी तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या होत्या. कोविड-19 मदतीसाठी देणगीदारांकडून 2020-21 मध्ये मिळालेल्या योगदानातील कथित अनियमिततेशी संबंधित प्रकरणाच्या संदर्भात अयुब यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in