Jharkhand political crisis | झारखंडमध्ये ऑपरेशन लोटस; आमदारांना घेऊन मुख्यमंत्री रवाना

Jharkhand political crisis मुख्यमंत्री हेमंत सोरेन आमदारांना घेऊन सुरक्षित ठिकाणी रवाना
Jharkhand political crisis
Jharkhand political crisis

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि बिहार नंतर आत झारखंडमध्येही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. झारखंडचे आमदार छत्तीसगडची राजधानी रायपूरला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन आपल्या आमदारांना 3 बसमधून रवाना झाले आहे. सर्व आमदारांना सुरक्षित रिसॉर्टमध्ये हलवण्यात आले आहे. यासोबतच सर्व आमदारांचे फोनही बंद करण्यात आले आहेत. याआधी आमदारांना छत्तीसगडला हलवले जाईल अशी अटकळ होती. प्रत्यक्षात आमदार सभेला हजर राहण्यासाठी आले असता त्यांच्या वाहनांमध्ये बॅगा व इतर वस्तूही दिसल्या. (Jharkhand political crisis Latest news)

निवडणूक आयोगाने सीएम सोरेन यांच्या विधानसभेच्या सदस्यत्वाबाबत राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे शिफारस पाठवली होती. त्यात काय आहे, ते पूर्णपणे समोर आलेले नाही, कारण राजभवनातून कोणतीही माहिती समोर आली नाही, मात्र आयोगाने सोरेन यांची आमदारकी रद्द करण्याची शिफारस केल्याचे मानले जात आहे. यामुळे थेट त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीलाच धोका निर्माण झाला आहे.

Jharkhand political crisis
सेना-ब्रिगेड युती : किती धूर निघावा तो.. दानवेंनी भातखळकरांना सुनावले..

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे विधानसभेचे सदस्यत्व कायम राहणार की जाणार यावरून राज्यात गोंधळ सुरू आहे. यूपीएच्या सर्व आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी त्यांना राज्याबाहेर हलवले जात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री निवासस्थानी बैठक बोलावण्यात आली होती. आमदारकी सोडल्यानंतर सीएम सोरेन यांना राज्यपाल रमेश बैस यांनी पदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते.

त्यानंतर सोरेन यांनी शुक्रवारी ट्विट केले होते की, आम्ही खुर्चीसाठी भुकेले नाही, आम्हाला फक्त लोककल्याणासाठी घटनात्मक व्यवस्थेसोबत चालायचे आहे.'' आज यूपीएच्या सर्व आमदारांना सीएम हाऊसमध्ये बोलावण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक खासदारही सहभागी झाले होते. सीएम सोरेनही मागच्या गेटवरून सभेला पोहोचले.

Jharkhand political crisis
सेना आमदार महेश शिंदेंना जितेंद्र आव्हाड यांनी सुनावले; पाहा व्हिडिओ

दरम्यान, सभेला हजर राहण्यासाठी आलेल्या काँग्रेस आमदार दीपिका पांडे यांच्या गाडीची डिकी उघडण्यात आली तेव्हा त्यात सुटकेससह खाण्यापिण्याचे बरेच साहित्य होते, त्यामुळे ही माहिती प्रसारमाध्यमांसमोर आली. त्यासोबतच इतर आमदारही सुटकेस घेऊन आले. आमदारांना घेऊन जाण्यासाठी तीन लक्झरी बसही आल्या होत्या, ज्या आमदारांना घेऊन सीएम हाउसमधून निघाल्या होत्या. आमदार बसंत सोरेन हे हेमंत सोरेन यांचे बंधू यांच्या नेतृत्वाखाली आहेत. तसेच पोलीस बंदोबस्त आहे. बहुमताच्या आकड्यांनुसार राज्यपाल जेएमएम पक्षाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करू शकतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in