भाजपचं ऑपरेशन लोटस? ; सोनिया गांधींनी तीन आमदारांना केलं निलंबित

जामतारा येथील इरफान अन्सारी, खिजरी येथील राजेश कछाप आणि कोळेबिरा येथील नमन विक्षल कोंगडी अशी निंलबित करण्यात आलेल्या आमदारांची नावे आहेत.
Sonia Gandhi
Sonia Gandhi sarkarnama

कोलकता : पश्चिम बंगालमधील हावडा परिसरामध्ये काल (शनिवारी) पोलिसांनी झारखंडमधील (jharkhand) काँग्रेस (Congress)आमदार प्रवास करत असलेल्या कारमधून कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. झारखंडमध्ये भाजपचं ऑपरेशन लोटस आज उघडकीस आलं असल्याची चर्चा आहे. (Congress latest news)

याप्रकरणी तीन आमदारांना पोलिसांनी काल ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून नोटा मोजण्याचे मशिन देखील ताब्यात घेण्यात आले आहे. आज (रविवारी) त्यांना काँग्रेसने निंलबित केले आहे. तीन आमदार रोख रकमेसह पकडल्यानंतर पक्षातच नव्हे तर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. (Police Arrested Congress MLA)

तृणमूल काँग्रेसचे नेते पार्थ चॅटर्जी आणि त्यांच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या सुरस आर्थिक लीला देशभर गाजत असताना पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. आमदाराच्या खरेदीसाठी ही रक्कम राज्यामध्ये आणण्यात आली होती, असा आरोप तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशनुसार या तीन आमदारांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पक्षाचे झारखंड प्रभारी अविनाश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणी रांचीच्या अरगोरा पोलीस (Police) ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसचे माध्यम प्रभारी पवन खेरा आणि झारखंड काँग्रेस प्रभारी अविनाश पांडे यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत आमदारांवर कारवाई केल्याची माहिती दिली.

Sonia Gandhi
Supreme Court : ठाकरे विरुद्ध शिंदे सुनावणी पुढे ढकलली

जामतारा येथील इरफान अन्सारी, खिजरी येथील राजेश कछाप आणि कोळेबिरा येथील नमन विक्षल कोंगडी अशी निंलबित करण्यात आलेल्या आमदारांची नावे आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेस अध्यक्षांनी २४ तासांत ही कारवाई केली आहे. शनिवारी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्या या तीन आमदारांना त्यांच्या कारमध्ये नोटांच्या बंडलांसह ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

झारखंडमधील हेमंत सोरेन सरकार पाडण्यासाठी या घटनेचा संबंध जोडला जात आहे. राज्यातील हेमंत सोरेन सरकार पाडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही या प्रकरणी दोनवेळा एफआयआर दाखल करण्यात आले आहे.भाजपला पैसा-बळ-कारस्थानाच्या जोरावर सत्ता मिळवायची आहे, असे काँग्रेसचे प्रदेश प्रभारी अविनाश पांडे यांनी म्हटले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर येथे कशासाठी रोकड आणली जात होती याचा पोलिस कसून शोध घेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com