गर्भवती पत्नीला परीक्षेसाठी तो स्कूटरवरुन घेऊन गेला तब्बल १२०० किलोमीटर

एका व्यक्तीने पत्नीच्या परीक्षेसाठी झारखंड ते मध्य प्रदेश असा प्रवास केल्याचे समोर आले आहे. त्याने गर्भवती पत्नीला घेऊन हा प्रवास केला आहे.
jharkhand man takes his pregnant wife on scooter to exam center in madhya pradesh
jharkhand man takes his pregnant wife on scooter to exam center in madhya pradesh

ग्वाल्हेर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत अनेक जणांनी पायी हजारो किलोमीटरवरील मूळ गाव गाठले होते. कोरोना संकटातील दुर्दम्य इच्छाशक्तीचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. झारखंडमधील एक व्यक्ती पत्नीला परीक्षा देण्यासाठी झारखंडहून तीन राज्ये पार करुन मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर असे १,२०० किलोमीटर स्कूटरवरुन घेऊन गेल्याचे समोर आले आहे. हा व्यक्ती तीन महिन्यांपासून बेरोजगार होता आणि पत्नीचे दागिणे गहाण ठेऊन त्याला स्कूटरमध्ये पेट्रोल भरावे लागले. अखेर त्याने जिद्दीच्या बळावर पत्नीसह ग्वाल्हेरमधील परीक्षा केंद्र गाठले. 

धनंजयकुमार हांसदा आणि सोनी हेम्ब्रम असे जोडप्याचे नाव आहे. सोनी ही सहा महिन्याची गरोदर आहे. धनंजकुमार हा झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यातील गंटा टोला गावचा रहिवासी आहे. त्याचे उत्पन्न जेमतेम आहे. त्याची पत्नी सोनी हिची पदविका भाग-२ परीक्षेची तारीख जाहीर झाली. ही परीक्षा ग्वाल्हेरला होती. हे परीक्षा केंद्र त्याच्या गावापासून १,२०० किलोमीटर अंतरावर आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रेल्वे आणि बस सेवा बंद आहेत. 

धनंजयकुमार यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी खासगी वाहन करुन परीक्षेला जाणे परवडणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी १,२०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर आपल्या स्कूटरवरुन पार करण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी परीक्षेसाठी झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशात ही तीन राज्ये पार केली. अखेर ते मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरला  सुखरुपपणे पोचले.  

धनंजय यांनी २८ ऑगस्टला प्रवास सुरू केला होता. ते ३० ऑगस्टला ग्वाल्हेरला पोचले. झारखंडच्या या धाडसी जोडप्याची दखल मध्य प्रदेश सरकारने घेतली आहे. त्यांना परतण्यासाठी दिल्लीपर्यंत विमानाचे तिकीट काढले आहे. तेथून गावाकडे जाण्याचीही  त्यांची सोय केली जाणार आहे. या सर्व प्रवासात त्यांना साथ देणारी त्यांची स्कूटर रेल्वेने पाठवण्यात येणार आहे. 

अमरावती : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या पाच महिन्यांपासून ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजली जाणाऱ्या एसटीची चाके थांबलेली होती. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. सामान्य जनतेची अनेक कामे अडून पडली होती. पण एसटी सुरू होताच लोकांची पावले एसटी बसकडे वळली. ग्रामीण भागांतील फेऱ्या सुरू केल्यानंतर अमरावती-पुणे ही लांब पल्ल्याची बससुद्धा येत्या रविवारपासून सुरू होणार आहे. मात्र कोरोनाचा धोका कायम असल्याने ही बस विनावातानुकूलित असणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com