IAS पूजा सिंघल ईडीच्या ताब्यात ; १९ कोटीचं सापडलं घबाड, अधिकारीही चक्रावले !

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या विश्वासू प्रशासकीय अधिकारी म्हणून पूजा सिंघल यांची ओळख आहे.
IAS Pooja Singhal
IAS Pooja Singhal sarkarnama

नवी दिल्ली : झारखंडच्या सनदी अधिकारी पूजा सिंघल (IAS Pooja Singhal) यांना ईडीनं (ed) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ताब्यात घेतलं आहे. त्याचे पती अभिषेक झा यांचे सीए सुमन कुमार यांनाही ईडीनं ताब्यात घेतलं आहे. पूजा सिंघल यांच्याकडून १९ कोटी ३१ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. एवढी रोकड पाहून ईडीचे अधिकारीपण चक्रावले. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या विश्वासू प्रशासकीय अधिकारी म्हणून पूजा सिंघल यांची ओळख आहे. (IAS Pooja Singhal latest news)

शुक्रवारपासून (ता.६) ईडीनं देशभरात रांचीसह २३ ठिकाणी ईडीनं छापामारी सुरु केली आहे. आज दुसऱ्या दिवशीही ईडीच्या पथकाने पूजा सिंघल यांची चौकशी केली. झारखंड, हरियाना, राजस्थान,पश्चिम बंगाल, बिहारमध्ये कालपासून ही मोठी कारवाई सुरु आहे.

IAS Pooja Singhal
महाविकास आघाडीची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार ? उद्धव ठाकरे की शरद पवार..

रांची येथील पल्स हाँस्पिटल शिवाय पंचवटी रेसिडेंट, कांके रोड, चांदनी चौक, हरिओम टॅावर येथे ईडीने छापेमारी केली. झारखंडच्या खनिज आणि भूवैज्ञानिक विभागाच्या सचिव पूजा सिंघल (Pooja Singhal) यांचीही कालपासून चौकशी सुरु होती. त्यांना आज ईडीनं ताब्यात घेतलं.

सिंघल यांच्यावर एका जुन्या मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. सुमन कुमार यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) गैरव्यवहारामुळे गेल्या काही दिवसापासून पूजा सिंघल या चर्चेत होत्या. त्यांच्यावर अचानक कारवाई झाल्याने देशभरात खळबळ उडाली.

IAS Pooja Singhal
भाजप, मोदी आजही जवाहरलाल नेहरुंवर टीका का करतात ? ; आमदार परिणय फुके म्हणाले..

पूजा सिंघल यांच्यावर चतरा, पलामू, खुंटी या जिल्ह्यांमध्ये उपायुक्त असताना मनरेगा योजनेत भ्रष्टाचार केल्याचाही आरोप आहे. पूजा सिंघल या झारखंड राज्याच्या खनिज विकास निगमच्या व्यवस्थापकीय संचालिका आहे. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या अनेक कामांची चौकशी सुरू आहे. ईडीने कोळसा व्यापार आणि बेकायदा कोळसा उत्खनन प्रकरणात धनबादमध्ये नऊ कंपन्यांवर कारवाई करण्यात आली.

झा्रखंडचे कनिष्ठ अभियंत्रा राम विनोद प्रसाद सिन्हा यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाशी संबधीत असलेल्यांवर ईडीनं फास आवळाला सुरवात केली आहे. सिन्हा यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आपल्या पदाचा गैरउपयोग करुन १८ कोटी रुपयांच्या सरकारी संपत्तीत गैरव्यवहार झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

IAS Pooja Singhal
पुढच्या टर्ममध्ये कॅबीनेटमंत्री व्हायला आवडेल ! .. आघाडीचं सरकार २५ वर्ष टिकेल !

सीए सुमन कुमारच्या ऑफिसमधून मोठी रोख रक्कम जप्त केली. आतापर्यंत सिंघल प्रकरणी ईडीच्या कारवाईत १९ कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जप्त झाली. राम विनोद प्रसाद सिन्हा याला भ्रष्टाचार प्रकरणात अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीआधारे ईडीने हे छापामारीचे सत्र सुरु केलं आहे. यात मोठ्या प्रमाणात संपत्ती जप्त करण्यात आली.

या प्रकरणातील मोठे मासे आता ईडीच्या गळाला लागत आहेत. पूजा सिंघल आणि उद्योगपती अमित अग्रवाल यांच्या कार्यालयावर ईडीनं छापा टाकला आहे. पूजा सिंघल यांचे घर, कार्यालयावर केलेल्या कारवाईचे फोटो समाजमाध्यमांवर शेअर झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com