पूजा सिंघल यांचा मुक्काम आता रांचीच्या होटवार कारागृहात

सिंघल यांच्याशी संबधीत २० ठिकाणी ईडीने चौकशी केली होती यात १९ कोटी ३१ लाख रुपये जप्त करण्यात आले होते.
Pooja Singhal
Pooja Singhalsarkarnama

नवी दिल्ली : मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणी अटकेत असलेल्या सनदी अधिकारी पूजा सिंघल (IAS Pooja Singhal Case) यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना आज ईडीनं न्यायालयात हजर केले होते. त्यांना ८ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रांची येथील होटवार कारागृहात त्यांनी रवानगी करण्यात आली आहे.

नऊ मे रोजी ईडीनं पूजा सिंगल यांना अटक केली होती. ईडीच्या चौकशीत त्यांच्याकडून अनेक महत्वपूर्ण माहिती मिळाली होती. आतापर्यंत तीन वेळा त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली होती. आज त्यांना ईडीच्या विशेष न्यायाधीश प्रभात कुमार शर्मा यांच्यासमोर हजर करण्यात आले. बीएमपी सिंह व आतिश कुमार यांनी ईडीकडून बाजू मांडली. पुढील सुनावणीत पूजा सिंघल यांच्यासोबत आरोपी सुमन कुमार, राम विनोद सिंहा यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Pooja Singhal
'एकदा आमची पण गरीबी हटू द्या' ; सदाभाऊ खोतांची ठाकरे सरकारकडे अजब मागणी

ईडीनं मनरेगा गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ६ मे रोजी झारखंड येथे सिंघल यांच्याशी संबधीत २० ठिकाणी ईडीने चौकशी केली होती यात १९ कोटी ३१ लाख रुपये जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी सिंघल यांचे पति अभिषेक झा यांचे सीए सुमन कुमार यांना जामीन देण्यात आला आहे. झारखंड सरकारने सिंघल त्याना निलंबित केले आहे.

खुंटी जिल्ह्यात 2008 ते 2011 दरम्यान मनरेगामध्ये झालेल्या 18 कोटींच्या घोटाळ्यासंबंधित ही छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळी पूजा सिंघल या खुंटीच्या जिल्हाधिकारी होत्या. पूजा सिंघल या झारखंड केडरच्या ज्येष्ठ आयएएस अधिकारी असून त्या झारखंडच्या खाण सचिव होत्या.

Pooja Singhal
नवाब मलिकांची कबुली ; हसीना पारकरचा बॉडीगार्ड सलीम पटेल हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता

पूजा सिंघल यांचं नाव अनेकदा वादात सापडलं आहे.पूजा सिंघल या 2000 बॅचच्या झारखंड केडरच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी भारत सरकारमध्ये कृषी सचिवापासून ते पर्यटन आणि उद्योग सचिव पदावर काम केलं आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं. त्यामुळे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्यांचं नाव नोंदवलं गेलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in