
नवी दिल्ली : सनदी अधिकारी पूजा सिंघल (IAS Pooja Singhal Case) प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. अनेक नेते आणि अधिकारी यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेले प्रेम प्रकाश श्रीवास्तव यांच्या हरमू कॅालनी, आणि अरगोडा येथील वसुंधरा अपार्टमेंट येथे ईडीचे पथक चौकशी करीत आहेत. एक बॅक कर्मचारी ते राजकीय व्यक्तींचे निकटवर्तीय अशी प्रेम प्रकाश श्रीवास्तव यांचे नाव आहे. त्यांना 'पीपी' या नावानं ओळखले जाते. (Pooja Singhal News)
ईडीच्या छापा पडल्यानंतर प्रेम प्रकाश स्वतः ईडीच्या कार्यालयात पोहचले आहेत. पूजा सिंघल प्रकरणात ही पाचवी छापेमारी आहे, ईडीचे अधिकारी आपल्या घरी येताच प्रेम प्रकाश यांनी थेट ईडीचं कार्यालय गाठले. सर्वसाधारण दिसणाऱ्या प्रेम प्रकाश हे झारखंडच्या राजकारण, आणि प्रशासकीय व्यवस्थेतील मोठ प्रस्थ आहे.
त्यांच्या मनाप्रमाणेच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असतं. सत्ता कुणाचीही असो, प्रेम प्रकाश हे नेहमी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांच्या जवळ असतात. त्यामुळे अधिकारी वर्गातही त्यांचा दबाव होता. सरकारी अधिकारी त्यांच्या सूचनेनुसार काम करतात. प्रेम प्रकाश यांच्यावर ईडीनं फास आवळल्यामुळे प्रशासनातील अनेक मोठे मासे ईडीच्या गळाला लागतील, अशी चर्चा आहे. "ईडीच्या चौकशीत सहकार्य करु," असे त्यांनी म्हटलं आहे.
'पीपी'हे झारखंडमधील मोठे प्रस्थ आहे, सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात त्यांची प्रमुख भूमिका असते. रांची येथील अशोक नगर परिसरात एका अपार्टमेंटमधून त्यांचे साम्राज्य चालते. येथे सर्वपक्षीय नेत्याची नेहमीच वर्दळ असते.गेल्या सात-आठ वर्षांत पीपी हे करोडपती झाले असल्याचे बोलले जाते. या छाप्यात ईडीला त्यांच्या घरी एक स्टार असलेले कासव सापडले आहे. हे कासव घरात ठेवल्याचे भाग्योदय होतो, अशी काही जणांनी श्रद्धा आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी हे कासव वनअधिकाऱ्यांकडे सोपविले आहे.
काल मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणी अटकेत असलेल्या सनदी अधिकारी पूजा सिंघल (IAS Pooja Singhal Case) यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना काल ईडीनं न्यायालयात हजर केले होते. त्यांना ८ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रांची येथील होटवार कारागृहात त्यांनी रवानगी करण्यात आली आहे.
नऊ मे रोजी ईडीनं पूजा सिंगल यांना अटक केली होती. ईडीच्या चौकशीत त्यांच्याकडून अनेक महत्वपूर्ण माहिती मिळाली होती. आतापर्यंत तीन वेळा त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली होती. आज त्यांना ईडीच्या विशेष न्यायाधीश प्रभात कुमार शर्मा यांच्यासमोर हजर करण्यात आले. बीएमपी सिंह व आतिश कुमार यांनी ईडीकडून बाजू मांडली. पुढील सुनावणीत पूजा सिंघल यांच्यासोबत आरोपी सुमन कुमार, राम विनोद सिंहा यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.