सोरेन यांनी पेट्रोल 25 रुपयांनी स्वस्त केलं अन् लोक म्हणाले, आमच्याकडे असे मुख्यमंत्री नाहीत!

झारखंडचे (Jharkhand) मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी पेट्रोल लिटरमागे 25 रुपयांनी स्वस्त करण्याची मोठी घोषणा केली आहे.
Petrol

Petrol

Sarkarnama

नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिक संकटात सापडले आहेत. यामुळे मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले आहे. आता झारखंडचे (Jharkhand) मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी पेट्रोल लिटरमागे 25 रुपयांनी स्वस्त करण्याची मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे सोशल मीडियावर मोठे स्वागत होत असून, सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री त्यांच्यासारखे असावेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्री सोरेन यांच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली आहे. सोरेन हे पेट्रोल 25 रुपयांनी स्वस्त करू शकतात तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री का करू शकत नाहीत? असा सवाल अनेक जण करीत आहेत. सोरेन यांच्यासारखे मुख्यमंत्री आपल्या राज्याला का नाहीत, अशी खंतही अनेकांनी व्यक्त केली आहे. सोरेन यांच्यासारखे मुख्यमंत्री प्रत्येक राज्याला मिळायला हवेत, अशी भावनाही अनेकांनी व्यक्त केली आहे.

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीचे सरकार आहे. मुख्यमंत्री सोरेन यांनी नवीन वर्षात 26 जानेवारीपासून पेट्रोल प्रतिलिटर 25 रुपये स्वस्त करण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी काही अटी घातल्या आहेत. दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. या नागरिकांना मोटारसायकल आणि स्कूटरसाठी हे स्वस्त पेट्रोल मिळणार आहे. राज्य सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

<div class="paragraphs"><p>Petrol</p></div>
राणेंना नोटीस येताच फडणवीसांनी वकिली बाणा दाखवत पोलिसांनाच आणलं अडचणीत

मोदी सरकारने 4 नोव्हेंबरला पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली आहे. उत्पादन शुल्क कमी केल्याने केंद्र सरकारला चालू आर्थिक वर्षात 1.4 लाख कोटी रुपयांच्या उत्पादन शुल्कावर पाणी सोडावे लागेल. देशात 3 लोकसभा आणि 30 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या आहेत. यात काही ठिकाणी भाजपला फटका बसला. सर्वाधिक फटका हिमाचल प्रदेशमध्ये बसला होता. हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी जाहीरपणे याचे खापर महागाईवर फोडले होते. याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये भाजपचे चारही उमेदवार पराभूत झाले होते. कर्नाटक आणि हरियानातील प्रतिष्ठेच्या लढतीततही भाजपला हार पत्करावी लागली होती.

<div class="paragraphs"><p>Petrol</p></div>
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

पुढील वर्षी 7 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये हिमाचल प्रदेश तर डिसेंबरमध्ये गुजरातमध्ये निवडणूक होत आहे. यातील पंजाब वगळता इतर 6 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा फटका भाजपला बसणार हे पोटनिवडणुकांतून समोर आले आहे. यामुळे केंद्र सरकारनंतर भाजप आणि विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांनीही पेट्रोल, डिझेलवरील करात कपात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com