नीतिश कुमारांना मोठा धक्का; भाजपनं बड्या नेत्याचेच घर फोडले

बिहारमध्ये राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
Amrish Tyagi Joins BJP
Amrish Tyagi Joins BJPSarkarnama

लखनऊ : बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार (Nitish Kumar) यांना मित्रपक्ष असलेल्या भाजपनंच (BJP) धक्का दिला आहे. नीतिश कुमारांच्या जनता दल यूनायटेडचे (JDU) राष्ट्रीय महासचिव के. सी. त्यागी यांचे घर फोडले आहे. त्यांचे पुत्र अमरीश त्यागी (Amrish Tyagi) यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे बिहारमध्ये राजकीय चर्चांना ऊत आला आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) भाजपला जास्त जागा मिळूनही नीतिश कुमार यांना मुख्यमंत्री करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेल्या नीतिश कुमार यांना भाजपकडून यापूर्वीही छुपे आव्हान देण्यात आलं आहे. आता भाजपने थेट बड्या नेत्याच्या घरातच घुसखोरी केल्याने नीतिश कुमारांना धक्का बसला आहे. के. सी. त्यागी हे नीतिश कुमार यांची विश्वासू सहकारी मानले जातात.

Amrish Tyagi Joins BJP
निलंबनानंतर संतापलेल्या प्रियांका चतुर्वेदींनी उचललं मोठं पाऊल...

त्यागी यांच्या मुलालाच भाजपने पक्षात प्रवेश दिल्याने बिहारमध्ये राजकीय चर्चांना ऊत आला आहे. अमरीश त्यागी हे उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये राहतात. विशेष म्हणजे अमरीश यांनी मागील विधानसभा निवडणुकीत नीतिश कुमार यांच्यासाठी निवडणूक व्यवस्थापनाचे काम केले आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबात लोकशाही व्यवस्था असून ते कोणत्याही पक्षात जाण्यासाठी स्वतंत्र आहेत, असं वक्तव्य केलं आहे.

अमरिश त्यागी म्हणाले, वडील के. सी. त्यागी हे एनडीएमधील घटक पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे भाजपशी नेहमीच जवळीक राहिली आहे. वडिलांची समाजवादी विचारधारा आणि भाजपचे हिंदुत्व ही विचारधारा एकाच परिवारात असू शकते. भाजपचे काम, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वामुळे मला भाजपमध्ये येण्याची प्रेरणा मिळाल्याचे अमरिश यांनी स्पष्ट केलं.

Amrish Tyagi Joins BJP
ओमिक्रॉननं गाठली राजधानी; टांझानियाहून आलेल्या प्रवाशाला लागण

अमरिश त्यागी हे निवडणूक व्यवस्थापनामध्येही आघाडीवर आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी जेडीयूसाठी काम केले होते. ते व्यवस्थापकीय संचालक असलेल्या ओवलीनो बिझनेस इंटेलिजंस प्रायव्हेट लिमिटेड या कंनपीने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठीही काम केले आहे. त्यागी यांच्या कंपनीला अमेरिकेतील आशियाई लोकांच्या मागण्या, अपेक्षांबाबत सर्वेक्षणाचे काम देण्यात आले होते. त्यामुळे ते आता उत्तर प्रदेशातही भाजपसाठी काम करणार असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com