Bihar : महाराष्ट्रानंतर आता या राज्यात होणार राजकीय भूकंप : भाजपसोबतची युती तोडणार ?

Nitish Kumar news update| बिहारमध्ये 11 ऑगस्टपूर्वी एनडीएचे सरकार पडेल आणि नितीश पुन्हा राजदसोबत सरकार स्थापन करतील का?, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Narendra Modi, Nitish Kumar
Narendra Modi, Nitish Kumar sarkarnama

पाटणा : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष होऊन राजकीय भूकंप झाला त्यानंतर आता आणखी एका राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिहारमधील (Bihar) राजकारणाला कलाटणी देण्याची तयारी सुरू आहे. भाजप आणि जेडीयूमध्ये नाते तुटण्याच्या मार्गावर आहे. (Nitish Kumar news update)

मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) आणि भाजपमध्ये (bjp) गेल्या अनेक दिवसांपासून शीतयुद्ध सुरू आहे. महिन्याभरातील घडामोडींवर नजर टाकली तर असे दिसते की नितीश आणि भाजपमध्ये सर्व काही सुरळीत चाललेले नाही.

नितीश कुमार यांनी एका महिन्यापासून भाजपपासून अंतर ठेवले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपमध्ये ज्या प्रकारे संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे,बिहारमध्ये 11 ऑगस्टपूर्वी एनडीएचे सरकार पडेल आणि नितीश पुन्हा राजदसोबत सरकार स्थापन करतील का?, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

बिहारमध्ये एनडीएचे सरकार पडेल आणि नितीश पुन्हा राजदसोबत सरकार स्थापन करतील. जेडीयूने आपल्या सर्व आमदार आणि खासदारांना उद्या (मंगळवारी) पाटणा येथे बैठकीसाठी बोलावले आहे. मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे.

Narendra Modi, Nitish Kumar
Dr Heena Gavit Accident : भाजप खासदार हीना गावित यांच्या गाडीला अपघात ; थोडक्यात बचावल्या

तेजस्वी यादव यांनीही 10 ते 12 तारखेदरम्यान आपल्या सर्व आमदारांना पाटण्यात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. आमदारांची बैठकही तेजस्वी यांनी बोलावल्याची माहिती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत.

काल (रविवारी) नितीश कुमार यांना पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी बोलावण्यात आले होते परंतु ते या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.

पुन्हा एकदा नितीश कुमार हे भाजपला सोडचिठ्ठी देऊन राजदसोबत जाणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार राहतील, मात्र यावेळी उपमुख्यमंत्री नसतील अशी तयारीही पूर्ण झाली आहे. तेजस्वी यादव यांच्याकडे गृहखात्याची जबाबदारी असू शकते, अशीही सूत्रांची माहिती आहे.

बिहारच्या राजकीय वर्तुळात हे सर्वश्रुत आहे की जनता दल युनायटेडचे ​​माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह यांचे भाजप नेत्यांशी चांगले संबंध आहेत आणि ते जनता दल युनायटेडचे ​​भाजपचे माणूस म्हणून काम करतात असे म्हटले जाते.

गेल्या वर्षी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तेव्हा नितीशकुमार यांच्या संमतीशिवाय आरसीपी सिंह केंद्रात मंत्री झाले.आरसीपी सिंग यांनी ज्या पद्धतीने प्रचंड संपत्ती मिळवली होती, त्याबाबत शनिवारी पक्षाचे स्पष्टीकरण मागितल्यानंतर आरसीपी सिंग यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com