मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार ; महिलेच्या केसांवर थुंकले जावेद हबीब

जावेदच्या सलूनमध्ये केवळ मुर्ख व्यक्तीच केस कापेल. मी गल्लीतल्या छोट्या दुकानात माझे केस कापेन, पण कधीच त्याच्या दुकानात जाणार नाही”
jawed habib, Yogi Adityanath

jawed habib, Yogi Adityanath

sarkarnama

मुजफ्फरनगर (उत्तरप्रदेश) : नामांकित हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब (jawed habib) यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याने या प्रकरणाची चैाकशी पोलिस करीत आहेत. ''हबीब यांच्यावर कठोर कारवाई करावी,'' असे संबधित महिलेने म्हटले आहे. या महिलेच्या केसात थुंकल्यानंतर जावेद हबीब या थुंकीत जीव असल्याचे व्हिडिओमध्ये सांगत असल्याचे दिसत आहे. याबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

मुजफ्फरनगरमधील एका कार्यक्रमाचा हा व्हिडिओ आहे. बागपतमधील बरौतची ही महिला रहिवासी आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हबीब यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

हबीब एका शोमध्ये केस कापत असताना ते या महिलेच्या डोक्यावर थुंकले. हा प्रकार पाहून नागरिक संतापले आहेत. “एक वेळ गल्लीतल्या नाक्यावर केस कापू पण जावेदच्या दुकानात जाणार नाही.” अशी जोरदार टीका केली जात आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येदरम्यान, या कृत्याबद्दल लोक जावेद हबीब यांच्यावर टीका करत आहेत.

हबीब यांनी ३ जानेवारीला एका शोमध्ये केसांची देखभाल आणि शॅम्पूचे महत्त्व सांगून पूजा गुप्ता यांच्या केसात थुंकले होते. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. , एका लाईव्ह शोमध्ये जावेद हबीब केस कापण्याचं प्रात्यक्षिक करू दाखवत आहे. बागपतमधील बरौतची ही महिला रहिवासी आहे. या महिलेचे केस कोरडे असल्याचे म्हणत हबीब हे त्यावर थुंकले. माझ्या केसात थुंकून हबीब यांनी माझा जाहीर अपमान केल्याचे महिलेचे म्हणणे आहे.

<div class="paragraphs"><p>jawed habib,&nbsp;Yogi Adityanath</p></div>
राजेश टोपेंनी घेतली पवारांची भेट ; जिल्हाबंदी, लोकल बंद होणार का ?

प्रात्यक्षिकात हबीब म्हणाले, “जर पाण्याची कमतरता असेल तर थुंकीचा वापर करा.” त्याचे हे कृत्य पाहून प्रेक्षक टाळ्या वाजवतात. काही जण तर त्यांना दाद देखील देतात. परंतु ज्या महिलेच्या (पुजा गुप्ता) डोक्यावर ते थुंकले तिला मात्र हे खूप अपमानास्पद वाटलं.

बदौतमध्ये वंशिका ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या पूजा गुप्ता म्हणाल्या, ''माझ्या ब्युटी पार्लरमध्ये अमन सर आणि आणखी एक व्यक्ती आले होते. मला त्यांनी सांगितले की, मुझफ्फरनगरमध्ये ब्युटी पार्लर आणि मेकअपवर एक सेमिनार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी अडीच हजार फी होती. कंपनीकडून ५० हजारांची भेट मिळेल आणि मला केमिकल मेकअप कसा करायचा हे शिकवले जाईल, असे सांगण्यात आले. याशिवाय जावेद हबीब यांना भेटण्याचीही संधी मिळणार आहे,''

<div class="paragraphs"><p>jawed habib,&nbsp;Yogi Adityanath</p></div>
तब्येत सुधारतेयं म्हणून ८४ वर्षीय पठ्यानं घेतले कोरोना लशीचे ११ डोस

एका व्हिडिओमध्ये तिने म्हटलं की “जर सार्वजनिकरित्या ते डोक्यात थुंकत असतील तर आपल्या प्रोडक्टमध्ये ते काय वापरत असतील हे आपण सांगूच शकत नाही. जावेदच्या सलूनमध्ये केवळ मुर्ख व्यक्तीच केस कापेल. मी गल्लीतल्या छोट्या दुकानात माझे केस कापेन, पण कधीच त्याच्या दुकानात जाणार नाही”

''व्हिडिओशी संबंधित अधिक माहिती गोळा केली जात आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल,'' असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अभिषेक यादव यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com