शिंजो आबेंवर जीवघेणा हल्ला कसा झाला? तीन व्हिडीओत कैद झाली घटना

शिंजो आबे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे.
Attack on Japan's Former PM Shinzo Abe
Attack on Japan's Former PM Shinzo AbeSarkarnama

नवी दिल्ली : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांच्यावर गोळीबार झाला असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. प्रचारसभेदरम्यान मतदारांना संबोधित करताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचे व्हिडीओ आता समोर आले आहेत. तसेच काही हल्लेखोराची छायाचित्रही व्हायरल झाली आहेत. (Shinzo Abe latest Marathi News)

पोलिसांनी आबे यांच्यावर गोळीबार झाडणाऱ्या व्यक्तीला घटनास्थळावरून अटक केली आहे. ४२ वर्षीय हल्लेखोराकडून बंदूक जप्त केली. पोलीस आरोपीची चौकशी करत असून त्याने गोळी का मारली हे देखील स्पष्ट झालेले नाही.

हल्ल्याचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये आबे हे भाषण करत असतानाच त्यांच्यावर गोळी झाडल्याचे दिसते. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी घटनास्थळीच हल्लेखोराला ताब्यात घेतल्याचे दिसते. तसेच आबे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची छायाचित्रंही व्हायरल झाली आहेत.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, शिंजो आबे वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीचा प्रचार करत होते. जपानमध्ये रविवारी (१० जुलै) वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी शिंजो आबे तेथे प्रचारासाठी गेले होते. तेव्हा संबंधित संशयिताने त्यांच्या जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्याजवळ जाऊन अचानक बंदुकीने गोळ्या झाडल्या. अशा स्थितीत घटनास्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

भाषण देताना अचानक गोळी लागल्याने आबे कोसळले. त्यारक्तबंबाळ अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 67 वर्षीय शिंजो आबे हे लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) पक्षाशी संबंधित आहेत. आबे 2006-07 दरम्यान पंतप्रधान होते. आबे हे आक्रमक नेते मानले जातात. शिंजो यांना अल्सरेटिव्ह कोलायटिस हा एक आतड्याचा आजार होता ज्यामुळे त्यांना 2007 मध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. शिंजो आबे सलग २८०३ दिवस (७ वर्षे ६ महिने) पंतप्रधान होते. यापूर्वी हा विक्रम त्याचे काका इसाकू सैतो यांच्या नावावर होता.

विशेष म्हणजे शिंजो आबे यांनी आपल्या कार्यकाळात सर्वाधिक वेळा भारताला भेट दिली. शिंजो आबे त्यांच्या पहिल्या कार्यकाळात (2006-07) पहिल्यांदा भारतात आले होते. शिंजो आबे यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात (2012-2020) तीनदा भारताला भेट दिली. जानेवारी 2014, डिसेंबर 2015 आणि सप्टेंबर 2017 मध्ये त्यांनी भारत दौऱ्यावर आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com