संसद भवनातील अटलबिहारी वाजपेयींची 'ती' खोली आता नड्डांच्या नावावर - J P Nadda To Take Room In Parliament Once Used By Atal Bihari Vajpayee-rm82 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

संसद भवनातील अटलबिहारी वाजपेयींची 'ती' खोली आता नड्डांच्या नावावर

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 जुलै 2021

2004 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार पडल्यानंतर एनडीएचे अध्यक्ष म्हणून त्यांना संसद भवनातील खोली क्रमांक चार देण्यात आली होती.

नवी दिल्ली : संसद भवनातील खोली क्रमांक चारच्या बाहेर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाची पाटी मागील सतरा वर्षांपासून होती. पण मंगळवारी (ता. 20) ही पाटी हटवण्यात आली. आता या खोलीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नावाची पाटी लागणार आहे. ही खोली नड्डा यांना देण्यात आली आहे. (J P Nadda To Take Room In Parliament Once Used By Atal Bihari Vajpayee)

2004 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार पडल्यानंतर एनडीएचे अध्यक्ष म्हणून त्यांना संसद भवनातील खोली क्रमांक चार देण्यात आली होती. तेव्हापासून त्यांच्या नावाची पाटी या खोलीबाहेर होती. 2018 मध्ये वाजपेयी यांच्या निधनांतरही ही पाटी हटवण्यात आली नव्हती. या पाटीशेजारी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नावाची पाटीही होती. ही पाटीही आता काढण्यात आली आहे. 

हेही वाचा : ऑपरेशन कमळ : मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्र्यांवरही होती पाळत

वाजपेयी या खोलीमध्ये खूप कमी वेळा बसत होते. 2009 मध्ये ही खोली अडवाणी यांना देण्यात आली. पण त्यांनी वाजपेयी यांच्या नावाची पाटी न काढता त्याजवळच त्यांच्या नावाची पाटी लावण्यात आली होती. त्यांची 2019 पर्यंत या खोलीत उठबस होती. 

2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्ते आल्यानंतर अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांचा समावेश सल्लागार गटामध्ये करण्यात आला होता. या गटाची पक्षामध्ये कोणतीही विशेष भूमिका नव्हती. एकेदिवशी 2014 मध्ये अडवाणी यांच्या नावाची पाटी हटवण्यात आली होती. त्यावेळी नाराज होऊन ते सेंट्रल हॅालमध्ये बसले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा पूर्वीच्या जागी पाटी लागली.

आता या खोलीमध्ये जे. पी. नड्डा बसणार आहेत. मंगळवारी वाजपेयी व अडवाणी यांच्या नावांची पाटी हटवण्यात आली. यापूर्वी नड्डा हे राज्यसभा सदस्यांसाठी राखीव असलेल्या खोलीचा वापर करत होते. भाजपच्या संसदीय दलाच्या खोलीशेजारीच ही खोली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख