बापरे...तरुणीला एकाचवेळी दिले कोरोना लशीचे सहा डोस अन्...

जगभरात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. यामुळे लसीकरणावर भर दिला जात आहे.
italian woman mistakenly given six doses of pfizer covid vaccine
italian woman mistakenly given six doses of pfizer covid vaccine

रोम : जगभरात कोरोना (Covid19)  संसर्गाची दुसरी लाट आली असून, रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. यामुळे लसीकरणावर (Covid Vaccination) भर दिला जात आहे. भारतासह अनेक देशांमध्ये लशीची टंचाई आहे. असे असताना इटलीत (Italy) मात्र, एका तरुणीला कोरोना लशीचे सहा डोस एकाच वेळी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

या तरुणीचे नाव डॅनिएला गिआनेली असे आहेत. ती नोव्हा रुग्णालयात कोरोना लस घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी नर्सने लशीच्या बाटलीतील एक डोस घेण्याऐवजी संपूर्ण लस इंजेक्शनमध्ये भरून घेतली. त्या बाटतील लशीचे सहा डोस होते. नर्सने ते इंजेक्शन संबंधित तरुणीला दिले. एकाचवेळी कोरोना लशीचे सहा डोस घेतल्यानंतर त्या तरुणीला अद्याप कोणताही त्रास झालेला नाही. 

हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला 24 तास अतिदक्षता विभागात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. नर्सने संबंधित तरुणीला इंजेक्शन दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. नर्सला पाच मोकळ्या सिरींज दिसल्यानंतर तिला तिची चूक कळाली होती. नंतर तिने रुग्णालय व्यवस्थापनाला याची माहिती दिली. 

याआधी फायझरच्या कोरोना लशीचे ओव्हरडोस झाल्याचे प्रकार अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियात घडले आहेत. आतापर्यंतचे ओव्हरडोस हे चार डोसपुरते मर्यादित होते. इटलीमध्ये पहिल्यांदाच फायझर लशीच्या ओव्हरडोसची नोंद झाली असून, एकाच वेळी सहा डोस देण्यात आले आहेत.   

भारतात 18 वर्षांवरील सर्वांना लस 
सध्या भारतात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com