Shinde vs Thackeray : सुप्रीम कोर्टात झालं होतं गरम, सरन्यायाधीशांनीच वातावरण केलं नरम

Supreme Court : कोर्टातील गरमीमुळे वकिलांना होत होता त्रास
Supreme Court
Supreme CourtSarkarnama

Supreme Court News : राज्यातील ठाकरे गट आणि मुख्यमंत्री शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सलग दुसऱ्या आज दिवशी सुनावणी झाली. त्यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल जोरदार युक्तिवाद करीत आपले सर्व मुद्दे मांडले. तसेच त्यांनी अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत.

सिब्बल (Kapil Sibbal) हे कालपासून ठाकरे गटाची सविस्तर आणि मुद्देसूद बाजू मांडत आहे. तसेच काही शंका आणि प्रश्नही उपस्थित केले. खंडपीठ त्यांची बाजू अतिशय लक्षपूर्वक ऐकून घेत आहेत. त्यामुळे कोर्टात तणावाचे वातावरण होत आहे. दरम्यान आज कोर्टात सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीशांनी केलेल्या एका वाक्यामुळे वातावरण हलकेफुलके झाले. त्यानंतर दोन्ही गटाच्या वकिलांनीही सरन्यायाधीशांच्या हजरजबाबीपणाचे कौतूक केले.

Supreme Court
Sharad Pawar : ''भगतसिंह कोश्यारी गेले ते बरे झाले, पदाची प्रतिष्ठा वाढविण्यात ते अपवाद ठरले''

सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आज ११ वाजता सुनावणीला सुरुवात झाली. कपिल सिब्बलांनी त्यांचा आजही युक्तिवाद सुरू ठेवला. कोर्टाची दुपारच्या जेवणाची वेळ जवळ आली तरी सिब्बल युक्तिवाद करीत होते. यावेळी शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग (Manindar Singh) यांना घाम आला होता. तो घाम कोर्टरुममधील उकाड्यामुळे आला होता. त्यांना गरमीचा त्रास होत असल्याचे सरन्यायाधीशांच्या लक्षात आले.

Supreme Court
Bawankule on Pawar : मुख्यमंत्री म्हणून फडणवीस नको : हीच होती पवारांची खरी अडचण; बावनकुळेंचा दावा

या गरमीच्या धागा पकडून सरन्यायाधीशांनी सिंग यांना कोपरखळी मारली. त्यावेळी त्यांनी युक्तीवाद करणाऱ्या सिब्बल यांना थांबविले. त्यानंतर ते मनिंदर सिंग यांना उद्देशून म्हणाले की, "मिस्टर मनिंदर सिंग कोर्टरुममध्ये तुम्ही एकटेच नाहीत. येथील सर्वांनाच गरमीचा त्रास होत आहे. आपण येथील एसी सुरू करू; पण तुम्हाला खरंच वातावरणामुळे गरम होतंय की सिब्बल यांचा युक्तिवाद ऐकून गरम होतंय?"

Supreme Court
Sanjay Raut : राऊतांना 'सुपारी'ची 'खबर' देणाऱ्याचा 'जबाब' शिंदे गटाकडे : तक्रार दाखल करण्याचा इशारा..

सरन्यायाधीशांच्या या मिश्किलपणामुळे कोर्टरुममध्येही एकच हशा पिकला. त्यानंतर सिब्बल यांनाही स्मितहास्य करून प्रसंगावधान राखत नम्रपणे म्हणाले की, सरन्यायाधीश तुमचीच कृपा. तर शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग यांनीही स्मितहास्य करीत सरन्यायाधीशांच्या हजरजबाबीपणाचे कौतूक केले. या किस्साने मात्र कोर्टरुममधील दोन दिवस असलेले तणावपूर्ण वातावरण निवळले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com