UPSC निकालात दरवर्षीच पडतेय मराठमोळे IPS महेश भागवतांची छाप!

केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील विविध राज्यांतील विद्यार्थ्यांसाठी भागवत यांचं मोफत मार्गदर्शन मोलाचं ठरत आहे.
IPS Mahesh Bhagwat with UPSC Rank 66 Anisha Shrivastava.
IPS Mahesh Bhagwat with UPSC Rank 66 Anisha Shrivastava.

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेचा दोन दिवसांपूर्वी निकाल जाहीर झाला. आयोगाकडून 761 उमेदवारांची केंद्र सरकारकडं शिफारस करण्यात आली. त्यापैकी तब्बल 131 उमेदवार हे असे आहेत ज्यांना मराठमोळ्या IPS महेश भागवत यांचं मार्गदर्शन मिळालं आहे. विशेष म्हणजे, 19 उमेदवार हे पहिल्या शंभरात आहेत. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील विविध राज्यांतील विद्यार्थ्यांसाठी भागवत यांचं मोफत मार्गदर्शन मोलाचं ठरत आहे.

महेश भागवत हे मुळचे अहमदनगरचे. सध्या ते तेलंगणातील राज्यातील रचाकोंडाचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. आपल्या कार्यकतृत्वानं त्यांनी तेलंगणामध्ये ठसा उमटवला आहे. गरजूंच्या मदतीसाठी धावून जाणारे अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. अधिकारी घडवणारे, अशीही त्यांची ख्याती आता देशभर पसरू लागली आहे. UPSC ची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी मोफत मार्गदर्शन करण्यासाठी ते तत्पर असतात. काही शिक्षणतज्ज्ञ, IAS, IRS, IPS अधिकाऱ्यांना सोबत घेऊन भागवत हे काम करत आहेत.

IPS Mahesh Bhagwat with UPSC Rank 66 Anisha Shrivastava.
अशीही भन्नाट ऑफर : काँग्रेसमध्ये कार्यकर्ते आणा अन् सोनं मिळवा!

मागील सात वर्षांत भागवत यांनी मार्गदर्शन केलेल्यांपैकी हजारांहून अधिक विद्यार्थी अधिकारी बनले आहेत. दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या निकालात 131 जणांना यश मिळालं असून 19 उमेदवार पहिल्या शंभरात आहेत. एका उमेदवाराने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. दिल्लीतील अंकिता जैन ही तिसरी आली असून तिची बहीण वैशाली ही 21 वी आली आहे. तसेच आंध्र प्रदेशातील रालापल्ली जगत साई आणि सालापल्ली वसंत कुमार हे भाऊ, तेलंगणातील टॉपर पी. श्रीजा हे काही यशस्वी उमेदवार असल्याचे भागवत यांनी सांगितले.

कामाच्या व्यापातून मिळेल त्याप्रमाणे भागवत व त्यांची टीम उमेदवारांना मुलाखतीसाठी मार्गदर्शन करते. हे सर्व व्हॉट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातून केलं जातं. केवळ तेलंगणाच नव्हे तर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, बिहार, आसाम, ओडिशा, पश्चिम बंगाल, जम्मू व काश्मीर या राज्यांतील विद्यार्थ्यांचाही यामध्ये समावेश आहे.

IPS Mahesh Bhagwat with UPSC Rank 66 Anisha Shrivastava.
काँग्रेसला आणखी एक झटका; माजी प्रदेशाध्यक्षांनी दिला AICC चा राजीनामा

उमेदवाराचे नाव, राज्य, पदवीचे विषय आदी माहितीच्या आधारे भागवत यांच्याकडून मार्गदर्शन केलं जातं. ते ग्रुपमध्ये विविध बातम्या, लेख, ताज्या घडामोडींची माहिती टाकत असतात. 'मला कामातून जेव्हा कधी वेळ मिळतो, त्यावेळी उमेदवारांना मुलाखतीसाठी मार्गदर्शन करतो. जेव्हा विद्यार्थी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होतात, त्यावेळी मला खूप आनंद होतो,' असं भागवत म्हणाले.

ही आहे भागवत यांची टीम!

डॉ. शैलेंद्र देवळणकर, डॉ. श्रीकर परदेशी (IAS), नितीश पाठोडे, नीळकंठ आव्हाड, आनंद पाटील मुकूल कुलकर्णी, डॉ. विवेक कुलकर्णी, राजीव रानडे, समीर उन्हाळे, सुप्रिया देवस्थळी, अभिषेक सराफ, साधू नरसिम्हा रेड्डी, अनुदीप दुरीशेट्टी आदी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com