Winter Session Parliament : भारतीय जमिनीवर चीनी सैन्याची घुसखोरी; राजनाथ सिंह म्हणाले...

राजनाथ सिंह यांच्या स्पष्टीकरणानंतर विरोधी पक्षांनी सभात्याग केला.
Winter Session Parliament |Rajnath Singh
Winter Session Parliament |Rajnath Singh

Rajnath Singh in Winter Session : अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पुन्हा एकदा भारतीय (India) आणि चिनी सैनिकांमध्ये मोठी चकमक झाली. ९ डिसेंबरच्या रात्री झालेल्या या चकमकीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले. घटनेच्या चार-पाच दिवसांनंतर ही घटना समोर आल्याने राजधानी दिल्लीत राजकारण चांगलच तापलं आहे.

यावरुन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत स्पष्टीकरण दिलं. ''चीनी सैनिकांनी भारतीय जमिनीवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय सैन्याने त्यांना चोख प्रत्त्युतर दिले. यावेळी दोन्ही सैन्यात मोठी झटापटही झाली. दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले. पण भारताचा एकही सैनिक गंभीर जखमी नाही, किंवा शहीद झाला नाही. भारतीय सैन्याने चोख उत्तर दिल्यानंतर चीनी सैनिकांची माघार घेतली, असे राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितले.

Winter Session Parliament |Rajnath Singh
Sanjay Raut : '' ...तो प्रश्न तुम्ही श्राद्ध उरकल्याप्रमाणे दोन मिनिटांत आटोपता!''

पण विरोधी पक्षांनी संसदेत या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली.यानंतर राज्यसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आपण आपल्या भारतीय सैन्याच्या शुरतेवर एकत्रितरित्या समर्थन केले पाहिजे, असे मत व्यक्त केले. पण विरोधक चर्चा करण्यावर ठाम होते. पण बिर्ला यांनी चर्चा नाकारल्याने विरोधकांनी गोंधळ करत सभात्याग केला.

दरम्यान, अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीसंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज बैठक बोलावली होती. राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, CDS लेफ्टनंट जनरल अनिल चौहान आणि NSA अजित डोवाल यांच्यासह तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com