धक्कादायक : नुपूर शर्मांचे समर्थन करणाऱ्या टेलरची निर्घृण हत्या; घटनेचा व्हिडीओही केला चित्रित

उदयपूरमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली असून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
Udaipur Incident
Udaipur IncidentSarkarnama

उदयपूर : भाजपनं निलंबित केलेल्या नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियात पोस्ट करणाऱ्या टेलरची दोघांनी भरदिवसा दुकानात घुसून निर्घृण हत्या केली आहे. हल्लेखोरांना हत्या करतानाचा व्हिडीओही तयार केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून राजस्थानमधील उदयपूर शहरात तणावाची स्थिती आहे. (Alert in Rajasthan)

कन्हैयालाल तेली असं हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याचे उदयपूर शहरात धनमंडी येथे टेलिंगचे दुकान आहे. याच दुकानात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कापड मोजमापाचा बहाणा करून दोघेजण हत्यारं घेऊन घुसले. त्यानंतर हत्या करतानाचा व्हिडीओ चित्रित होईल, अशाप्रकारे तयारी करून त्यांनी तरूणावर हल्ला केला.

Udaipur Incident
निवडणूक शपथपत्रातील तफावत शिंदेना भोवणार? थेट न्यायालयात पोहचलं प्रकरण

हल्लेखोरांनी तरूणाचा गळा चिरून हत्या केली आहे. तसेच शरीरावर अनेक वारही केले. या घटनेच्या व्हिडीओमध्ये हल्लेखोरांनी हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. तसेच ज्या हत्याराने हत्या करण्यात आली तेही व्हिडीओमध्ये दाखवताना दिसत आहेत. सोशल मीडियात हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. त्यानंतर सर्वच एकच खळबळ उडाली आहे.

काही दिवस दुकान ठेवले बंद

कन्हैयालाल यांच्या आठ वर्षांच्या मुलाने सोशल मीडियात नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट टाकली होती, असं वृत्त काही माध्यमांनी दिलं आहे. दरम्यान, ही पोस्ट आल्यानंतर विशिष्ट समाजातील लोकांकडून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यास सुरूवात झाली. त्यामुळे त्यांनी सहा दिवसांपासून दुकान बंद ठेवले होते. तसेच याबाबत पोलिसांकडेही तक्रार दिली होती.

या घटनेनंतर उदयपूरसह राजस्थानमधील अन्य काही भागात तणावाचे वातावरण आहे. काही भागात जाळपोळ करण्यात आली असून लोक रस्त्यावर उतरले आहे. त्यामुळे उदयपूरमधील इंटरनेट सुविधाही बंद केल्याचे समजते. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. या घटनेत सहभागी असलेल्या सर्व आरोपांवर कठोर कारवाई केली जाईल. सर्वांनी शांतता राखून सहकार्य करावे. देशात अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी अशा घटनांबाबत बोलून नागरिकांना शांततेचे आवाहन करावे, असंही गेहलोत यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com