Karnataka Election 2023: बंडखोरी, 'ऑपरेशन लोटस'च्या धक्क्यानंतर काँग्रेसचा मोठा विजय; काय घडलं होतं २०१९ मध्ये?

Karnataka VidhanSabha Election Result 2023 | कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ करत एकहाती सत्ता मिळवली.
Karnataka Election 2023:
Karnataka Election 2023: Sarkarnama

Karnataka Assembly Election Result 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ करत एकहाती सत्ता मिळवली. काँग्रेसला या निवडणुकीत १३६ जागा मिळाल्या. तर भाजपला केवळ ६४ जागा आणि जेडीएस'ला २० जागांवर समाधान मानावे लागले. या विजयाने काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकले आहेत. विजयानंतर देशभरात काँग्रेसच्या कार्यालयात उत्साहाचे वातावरण आहे. कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरवात केली आहे. काँग्रेसने या निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ करत सत्तेकडे वाटचाल सुरु केली आहे. (Insurgency, major victory for Congress after setback of Operation Lotus; This is the history since 2004)

पण कर्नाटकात पाच वर्षांपुर्वी कर्नाटकात परिस्थिती काही वेगळीच होती.२०१८ मध्ये निवडणुकीत १०४ काँग्रेसला ८० आणि जेडीएसा ३७ जागा मिळाल्या. कोणत्या पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकु परिस्थिती निर्णण झाली . त्यानंतर राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला बहुमताच्या चाचणीची संधी दिली. पण भाजप बहुमत सिद्ध करु न शकल्याने येडियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर कर्नाटकात काँग्रेस -जेडीएस चे सरकार स्थापन केले. आश्चर्यकारकरित्या एच.डी. कुमारस्वामी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. (Karnataka Election 2023 )

Karnataka Election 2023:
Karnataka Assembly Elections Result 2023 Live : कर्नाटकमध्ये काँग्रेसची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल; भाजपने गमावले दक्षिणेतील एकमेव राज्य...

त्यानंतर २०१९ मध्ये ऑपरेशन लोटस राबवत काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार फोडले आणि पुन्हा येडियुरप्पा मुख्यमंत्री झाले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने जेडीएसला मुख्यमंत्रीपद दिलं. पण यामुळे काँग्रेसचेच अनेक आमदार नाराज झाले. काँग्रेस वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या बंडखोरीच्या भाषेमुळे मुख्यमंत्री कुमारस्वामी हतबल झाले होते. अखेर एक दिवस काँग्रेस आणि जेडीएसच्या १२ आमदारांनी बंडखोरी करत राजीनामा दिला. पुढे आणखी चार आमदारही बाहेर पडले आणि एकूण 16 आमदार सत्ताधारी पक्षापासून दूर झाले. या बंडखोरीत दोन अपक्ष नेत्यांनीही काँग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घेत भाजपला पाठिंबा दिला. (Karnatak Election Result 2023 Latest news Update)

हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने कुमारस्वामी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले पण कुमारस्वामी बहुमत सिद्ध करु शकले नाहीत. अखेर कुमारस्वामी यांना राजीनामा द्यावा लागला आणि राज्यात पुन्हा एकदा भाजपची सत्ता स्थापन झाली.

Karnataka Election 2023:
Devendra Fadanvis यांचा Congressवर निशाणा | BJP | Karnatak Election | Maharashtra | Sarkarnama

दरम्यान, 2013 च्या निवडणुकीमध्येही काँग्रेसला १२२ जागांवर विजय मिळला होता. भाजपला त्यावेळी केवळ 40 जागा मिळाल्या होत्या. आणि जेडीएसला देखील 40 जागा मिळाल्या होत्या. तर, इतरांना 22 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस एकहाती सत्तेत आली होती. तर 2008 च्या निवडणुकीमध्ये भाजप कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेवर आला होता. येडियुरप्पा मुख्यमंत्री झाले होते. (Karnataka Elections result National Political news)

भाजपला 110 जागा मिळाल्या होत्या. अपक्षांच्या मतीने सरकार बनवले होते. 2004 मध्येही कर्नाटकात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी कर्नाटमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत आहे. हे ऐतिहासिक बहुमत आहे. त्यामुळे काँग्रेससाठी कर्नाटकातील विजय अतिशय महत्त्वाचा आहे. दक्षिणेतील एकमेव राज्यात भाजपचे सरकार होते, ते सरकारही गेल्यामुळे भाजपसाठी हो धोक्याची घंटा मानली जात आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com