
Assembly Election News: भाजप पाठोपाठ आता काँग्रेसही छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने 31 जागांसाठी नावे निश्चित केली आहेत. ही नावे स्क्रिनिंग कमिटीकडे पाठवण्यात आली आहेत. शुक्रवारी म्हणजेच ८ सप्टेंबरला पक्षाची स्क्रीनिंग कमिटी या नावांवर निर्णय घेईल.
राजनांदगाव येथे पक्षातर्फे विश्वस्त परिषदेचे आयोजन करण्यात येत असून, त्यात पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हेही सहभागी होणार असल्याचे समजते. या परिषदेनंतर काँग्रेस (Congress) आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करू शकते, असे बोलले जात आहे. या 31 जागांवर मुख्यमंत्री भूपेश बघेल, उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव आणि ताम्रध्वज साहू यांच्यासह सर्व मंत्र्यांची नावे आहेत.
याशिवाय ज्येष्ठ आमदारांचीही नावे या यादीत असल्याचे बोलले जात आहे. भाजपने (BJP) छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी 17 ऑगस्ट रोजीच 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. ज्यामध्ये कांकेरमधून आशाराम नेताम, प्रेमनगरमधून भुलनसिंग मरावी आणि कोरबामधून लखनलाल दिवांगन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
पहिल्या यादीत दहा अनुसूचित जमाती आणि एक अनुसूचित जाती व्यतिरिक्त भाजपने खासदार विजय बघेल यांच्यावरही विश्वास व्यक्त केला आहे. खासदार विजय बघेल हे भूपेश बघेल यांचे पुतणे असून त्यांना पाटणमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.