इंदूमिल स्मारक : धनंजय मुंडेंनी गाझियाबादमध्ये जाऊन केली पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr. Babasaheb Ambedkar यांच्या पुतळ्याची प्रतिकृती उत्तर प्रदेशातील Uttar Pradesh गाझियाबाद Gaziyabad येथील प्रसिद्ध आर्टिस्ट पद्मभूषण राम सुतार Ram Sutar यांच्या फाईन आर्टस् या ठिकाणी सुरू आहे.
Dhananjay Munde, Varsha Gaikawad
Dhananjay Munde, Varsha Gaikawadsarkarnama

गाझियाबाद : मुंबईतील इंदूमिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारक स्थळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य 350 फुटी पुतळा बसवण्यात येणार असून या पुतळ्याची प्रतिकृती उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील प्रसिद्ध आर्टिस्ट पद्मभूषण राम सुतार यांच्या फाईन आर्टस् या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी पुतळ्याची 25 फुटी प्रतिकृती तयार करण्यात आली असून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, यांसह राज्य शासनाच्या समितीने गाझियाबाद येथे भेट देऊन या कामाची आज पाहणी केली.

मुंबईतील इंदूमिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य अंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत असून, याचे काम जरी एमएमएमआरडीएकडे असले, तरी त्याच्या सनियंत्रणाची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाने घेतलेली आहे. राज्य सरकारने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमली असून या समितीमध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांचाही समावेश आहे.

Dhananjay Munde, Varsha Gaikawad
ऊर्जामंत्र्यांनी आणली ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’

स्मारक स्थळी उभारण्यात येणार असलेला पुतळा अंतिम करण्याची जबाबदारी देखील या समितीकडे असल्याने आज गाझियाबाद येथे या समितीने भेट देऊन पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी केली. सदर 25 फुटी प्रतिकृती तयार करताना एमएमआरडीएने काही बदल त्यामध्ये पूर्वी सुचवले होते. ते बदल करून राम सुतार यांनी 25 फुटी प्रतिकृती साकारली आहे. पद्मभूषण राम सुतार यांनी सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या स्मारकासह अनेक पुतळ्याचे काम यापूर्वी केलेले आहे.

Dhananjay Munde, Varsha Gaikawad
मुख्यमंत्री म्हणतात, आता इंदू मिल स्मारकाचा कार्यक्रम होईल तो सगळ्यांच्या सहभागानेच!

या प्रतिकृतीची पाहणी करताना धनंजय मुंडे यांसह समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शरीर यष्टीप्रमाणे पाय, पोट, डोके आदी रचना हुबेहूब असाव्यात याबाबत आणखी काही बदल आज सुचवले आहेत. हे बदल पूर्ण करून त्यास एम एम एम आर डी ए व राज्य शासनाच्या समितीची मान्यता घेतल्यानंतर मुख्य पुतळ्याचे काम हाती घेता येणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Dhananjay Munde, Varsha Gaikawad
Video: ओबीसींना राजकारणात प्रतिनिधित्व मिळावं- अजित पवार

सुमारे 1100 कोटी रुपये खर्चून इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम करण्यात येत असून, इंदूमिल येथे ज्या 100 फुटी पिलर वर मुख्य पुतळा वसवण्यात येणार आहे, त्या पिलरचे 75% काम पूर्ण झाले असून, लवकरच ते काम पूर्ण केले जाणार आहे. पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी केली असून, त्यात काही बदल सुचवले आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर मुख्य पुतळ्याच्या निर्मितीचे काम हाती घेण्यात येईल.

Dhananjay Munde, Varsha Gaikawad
Video: उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात एकाच वेळी राष्ट्रपती राजवट लावा; संजय राऊत

निधी उपलब्ध होण्याबाबत कोणतीही अडचण नसल्याने हे काम वेळेत पूर्ण होईल, असे यावेळी धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदूमिल येथे बसवण्यात येणाऱ्या मुख्य पुतळ्याची निर्मिती ही प्रतिकृती अंतिम झाल्यानंतरच सुरू करण्यात येईल, यासाठी प्रतिकृतीचे काम वेळेत पूर्ण केले जावे, अशा सूचना यावेळी मंत्रिमंडळ समितीने शिल्पकार राम सुतार व त्यांच्या टीमला दिल्या आहेत.

Dhananjay Munde, Varsha Gaikawad
Sadabhau Khot : उद्धव ठाकरे सरकारचा कारभार औरंगजेबासारखाच..

यावेळी श्री. मुंडे यांच्या सह शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री. सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, सर जे जे चे अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे, इतिहास तज्ञ रुबी मलेपीन, एम एम आर डी ए चे मुख्य अभियंता प्रकाश भांगरे, पद्मभूषण राम सुतार, अनिल राम सुतार, सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव दिनेश डिंगळे, शापुरजी पालंजी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक उमेश साळुंखे, प्रकल्प सल्लागार अतुल कवटीकवार, विनय बेडेकर, प्रशांत गेडाम आदी उपस्थित होते.

Dhananjay Munde, Varsha Gaikawad
Video: शरद पवार रमले बाळासाहेबांच्या आठवणींत

स्मारकाच्या कामास वेग

राज्य शासनाने धनंजय मुंडे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वात इंदूमिल स्मारकाच्या सनियंत्रणसाठी एक उपसमिती नेमली आहे. या समितीच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्या सह अन्य सदस्यांनी नुकतीच इंदूमिल येथील स्मारक स्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली होती. त्यानंतर आज गाझियाबाद येथे येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी केली आहे. स्मारकाच्या एकूणच कामाला आता वेग आल्याचे दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com